Friday, 20 December 2013

विवेकानंद अपंग शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरावर



दि.१६ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आलेल्या अपंगाच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत विवेकानंद आश्रम व्दारा संचालित, विवेकानंद निवासी अपंग विद्यालयातील ६ विद्याथ्र्यांनी वेगवेगळया खेळ प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी पात्रता मिळवली. दि.१६.१२.२०१३ रोजी विवेकानंद आश्रमाच्या भव्य क्रिडांगणावर या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन जिल्हा समाज कल्याण विभाग,जिल्हा कल्याण जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले होते. या स्पर्धांमध्ये अपंग विद्यालयातील अनिल दत्तात्रय शिंदे ५० मीटर व १०० मि या खेळप्रकारात प्रथम, कु.शिवानी संदीप अंभोरे ५० मि व १०० मि. धावणे खेळप्रकारात प्रथम, महेश माणिकराव चोखट २५ मि.धावणे प्रथम,विष्णु अंकुश अजगर १०० मि. धावणे या खेळप्रकारात प्रथम,कु.दिपाली समाधान घोडक ५० मि. व्हीलचेअर रेस व व्हिलचेअवर बसून सॉफ्ट बॉल थ्रो या खेळप्रकारात प्रथम तर कु.आरती बंडु जाधव २५ मि.भरभर चालणे या खेळप्रकारात प्रथम येवून ३ ते ५ जानेवारी २०१४ ला अमरावती येथे होणा-या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी प्रात्रता मिळवली .या यशाबदल आश्रमाचे अध्यक्ष प.पू.शुकदास महाराजांनी मुलांचे अभिनंदन केले व पुढे होणा-या स्पर्धेत यशाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका तसेच विवेकानंद निवासी अपंग विद्यालय व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी मुलांच्या यशासाठी परिश्रम घेतले.

Monday, 16 December 2013

अपंगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा हिवरा आश्रम येथे संपन्न !




समाज कल्याण विभाग, जि.प.बुलडाणा व विवेकानंद आश्रम, हिवरा यांचे सयुक्त विद्यमाने दि.१६/१२/२०१३रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. सदर क्रिडा स्पर्धेला कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांनी आर्शिवाद दिले. स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद कृषि व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एकनाथ पाटील यांचे हस्ते तर डॉ.पवित्रकार प्राचार्य कृषि महाविद्यालय यांचे अध्यक्षेतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.एस.एस.नागापूरकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बुलडाणा, श्री. एस.एम.पुंड सहाय्यक सल्लागार अपंग विभाग जि.प.बुलडाणा, विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते, प्राचार्य श्री.करोडदे, श्री.म्हस्के, श्री.लाव्होळे, श्री.अग्रवाल, श्री.शेख, श्री. उबरहांडे, श्री.अंदुरकर, सौ.साऊरकर, सौ.गोरे, श्री. शेळके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय अपंग स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून प्राचार्य डॉ.पाटील व मान्यवरांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. सदर क्रिडा स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अपंग शाळा उपस्थित होत्या. त्यामध्ये कर्णबधिरांच्या हिवरा आश्रम, खामगाव, बुलडाणा, चांडोळ, लोणार, मलकापूर, दे.मही इत्यादी तर अस्थिव्यंगांच्या हिवरा आश्रम, मेहकर, डोणगाव, चिखली, दे.मही,शेगाव, पातुर्डा इत्यादी तर मतिमंदाच्या खामगाव, बुलडाणा, शेगाव इत्यादी व अंधाची बुलडाणा येथील अंध शाळा उपस्थित होती. सदर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अपंगाच्या कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद,अंध व बहुविकलांक प्रवर्गातील मुला-मुलीसाठी खालील क्रिडास्पर्धा संपन्न झाल्या कर्णबधिर ५०,१००,५००मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, १०० मी. पोहणे इत्यादी अस्थिव्यंग ५०,१०० मी., सॉफ्ट बॉल थ्रो, व्हील चेअर इत्यादी बहुविकलांगासाठी लगोरी फोडणे, बाटलीत बाल टाकणे, २५ मी. चालणे इत्यादी, मतिमंदसाठी ५० मी. धावणे, गोळा फेक, स्पॉट जम्प, सॉफ्ट बॉल थ्रो अंधासाठी बुध्दीबळ स्पर्धा, गोळा फेक,२५,५०,,१०० मी. धावणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजयी झालेल्या स्पर्धकाची निवड राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी करण्यात आली. राज्यस्तरीय अपंगाच्या क्रिडा स्पर्धा दि.३ जानेवारी ते ५ जानेवारी २०१३ रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित केल्या असून तेथे निवड झालेल्या खेडाळूना खेण्याची संधी मिळणार आहे.सदर क्रिडा स्पर्धेचे प्रास्ताविक समन्वयक प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सुनिता गोरे यांनी केले. जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभाग, जि.प.बुलडाणा व जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या अपंग शाळा तथा विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी व अपंग कर्णबधिर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेवून जिल्हास्तरीय अपंगाच्या क्रिडा स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केल्या.

मुक्तीसाठी नामस्मरण-ह.भ.प. राजु महाराज खराडे


कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर एकादशीनिमित्त १३ डिसेंबर रोजी ह.भ.प. राजु महाराज खराडे यांचे किर्तनाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.यावेळी ह.भ.प. बालकिर्तनकार राजु महाराज खराडे यांनी तुका म्हणे जपा।मंत्र त्रिक्षरी सोपा। या अभंगाचे निरूपन करतांना नामस्मरणाचे महत्व विषद केले.निरूपन करतांना ते पुढे म्हणाले की, भक्त प्रल्हाद,दामोपंत ,सावता माळी यांच्या नामस्मरणा संबंधीचे उदाहरणे देवून नामाचे श्रेष्ठत्व,नामाची महती,नामस्मरण घेतल्याने होणारा जीवनाचा उध्दार,यासाठी सोपा उपाय म्हणजे ‘तुका म्हणे जपा। मंत्र त्रिक्षरी विठ्ठल नामाचे नामस्मरण हे सोपे साधन उपाय आहे. या धकाधकीच्या जीवनात योग ,ज्ञान,उपसाना,कर्मकांड करणे सहज होऊ शकत नाही म्हणून नामस्मरण करावे.एकादशिनिमित्त विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर झालेल्या किर्तनात ह.भ.प. राजु खराडे महाराजांनी गीता जयंती व एकादशीनिमित्त किर्तन व गीतेचे महत्व उपस्थितांना पटवून दिली.या कार्यक्रमाला गावकरी व परिसरातील बहुसंख्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 4 December 2013

उपाध्यांचे ओझे कमी करा,तुम्ही सुखी व्हाल-प.पू.शुकदास महाराज

येथील विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष कर्मयोगी संन्याशी प.पू.शुकदास महाराजांचा ७० वा वाढदिवस सोहळा मोठया आनंदाने व भक्ती भावाने १ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.सकाळपासून राज्याच्या कान्याकोप-यातुन आलेल्या हजारो भाविक भक्तांनी विवेकानंद आश्रमात एकच गर्दी केली होती त्यामुळे हिवरा आश्रम परिसर फुलून गेला होता.यावेळी अनेक मान्यवरांनी दिवसभरात महाराजश्रींची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.सायंकाळी व्यासपीठावर झालेल्या अभिष्ठचिंतन सोहळयाची सुरूवात आश्रमाचे गायक वृंद गजाननदादा निकम,सज्जनसिंग राजपूत,शाहीर ईश्वरदादा मगर,आकाशवाणी कलावंत सुभाष सवडतकर,प्रा.अभय मासोदकर,शशिकांत बेंदाडे यांनी ''ब्रम्हरूपा जय ब्रम्हरूपा शुन्यामधून विश्व निर्मीले हिव-याच्या शुकदासांनी'' या गाण्याने व्यासपीठ दणाणून सोडले. सायंकाळी व्यासपीठावर महाराजांचे अभिष्ठचिंतन करण्यात आले.यावेळी उपस्थिानांना आशिर्वादवर बोलतांना प.पू.महाराजश्री पुढे बोलतांना म्हणाले की,‘‘ कृषि पंपाने ओढल्या गेलेले पाणी,बाहेर फेकल्या गेले पाहिजे,नाहीतर पंप गरम होवून बंद पडू शकतो. सोडलेले पाणी अनाठाई जावू नये, त्याचा उपयोग लोकांना पाणी पिण्यासाठी व शेतीतील उत्पादन वाढीसाठी व्हावा. पैसे कोणीच खात नाही. जास्तीच्या उपभोगाने अनेक रोग जडतात. वाढीव संपत्तीचा उपयोग थोडाफार तरी दुस-यासाठी व्हावा. ‘अंती देहसुद्धा सोबत येवू शकत नाही.पुढे बोलतांना ते म्हणाले की,‘‘एका शतका आतील जगणा-यांनी हजारो वर्षांचा निरर्थक विचार करणे हास्यास्पद आहे! एवढा आटापिटा कशासाठी? तुमच्या चेह-यावरचं हास्य, समाधान, शांती, आनंद, सुख तुम्हीं गमावून बसलेले आहात. कंजुषी आणि मतलबामुळे माणूस समाजातून एकाकी पडतो. उपाध्यांचे ओझे कमी केल्या शिवाय, मनुष्याला ‘मुक्त होता येत नाही. ‘सौंदर्य हे बाहेर असते, आणि आतले असते ते ‘औदार्य!
सध्या ‘मी ज्या देहामध्ये थांबलो आहे, त्यातून बाहेर पडेपर्यंत तुमच्या सेवेत आहेच.आशिर्वचनानंतर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.तसेच वृध्द आश्रमाती २५ वृध्द ,स्त्री पुरूषांना कपडे वाटप करण्यात आले.या वाढदिवस शुभचिंतन सोहळयाचे रसाळ आणि भावपूर्ण तथा अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन गजाननदादा शास्त्री महाराज यांनी केले.त्यानंतर शेवटी दि.२१,२२,२३ जानेवारी २०१४ रोजी संपन्न होत असलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाच्या उत्सव समितीची सभा संपन्न झाली.
अनेक मान्यवरांनी प.पू.शुकदास महाराजांचे पुष्पहारांनी पूजन केले यामध्ये आ.डॉ.संजय रायमुलकर,माजी मंत्री सुबोध सावजी,माजी आमदार नानाभाऊ कोकरे,रा.का.च्या महिला तालुका अध्यक्ष आशाताई झोरे,जि.प.सदस्य बाळासोहब दराडे,आश्रमाचे उपध्याक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त कैलास भिसडे,व्यवस्थापक अशोक थोरहाते,अ‍ॅड किशोर धोंडगे ,प्राचार्य डॉ.एकनाथ पाटील,पवित्रकार,पंढरीनाथ शेळके,जे.डी.सोळंकी,संत शुकदास पत संस्थेचे अध्यक्ष तथा हरिहरतीर्थाचे व्यवस्थापक पुरूषोत्तम आकोटकर,सुनिता गोरे,सौ.संगीता चौधरी,प्रा.प्रशांत पडघान ,जि.के.ठाकरे,मनोज मु-हेकर,उपसरपंच मनोहर गि-हे पाटील,तंटामुक्त अध्यक्ष संजय वडतकर,अशोक गिèहे,डी.पी.मिसाळ,राज्य संघटक संजय दुणगू,अनंत शेळके,शिक्षकपत संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र मोरे,भगवान राईतकर,प्रमोद सावरकर,शशिकांत बेंदाडे,माजी विश्वस्त मा.बा.केंदळे,मंडळाधिकारी विजय पिंपरकर,साळुंके,तलाठी राजेंद्र आव्हाळे ,ग्रामसेवक सदाशिव म्हस्के,माजी सरपंच जगन्नाथ जवंजाळ,मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी धोंडगे,प्रमोद रायमुलकर,प्रकाश रहाटे,सुनिल काकडे संचालक सुधाकर शिंगणे बालरोगतज्ञ मनिष धातरकर,पत्रकार समाधान म्हस्के आदी हजर होते.



Monday, 2 December 2013

मोफत रोगनिदान शिबिरात दहा हजार रूग्णांनी घेतला लाभ






विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नागपूर येथील बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ एन.के.पी.साळवे मेडीकल कॉलेज नागपूर व लता मंगेशकर रूग्णालय नागपूर आणि विवेकानंद आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले.होते.३० नोव्हेंबर रोजी रात्री १२५ डॉक्टरांचा चमू विवेकानंद आश्रमात दाखल झाला होता.या शिबिराचा लाभ परिसरातील दहा हजाराहून अधिक रूग्णांनी घेतला.
सकाळी ८ शिबिराला सुरूवात झाली या शिबिराचे उद्घाटन प.पू.शुकदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुलडाणा जिल्हा नागरिक जिल्हा नागरिक मंडळ नागपूरचे अध्यक्ष डॉ.नामदेवराव सास्ते ,सचिव प्रा.गणेश केदार,संयोजक शरद राठी,प्रमुख समन्वयक डॉ.विठ्ठलराव दांडगे,सदस्य डॉ.राम जोशी ,सचिव विद्या शिक्षण प्रसारक मंडळ डॉ.अमोल देशमुख ,डॉ.देवके,डॉ.जगदिश कोठारी ,भारती सेवा मंडळ नागपूरचे राम आखरे,राजे सावळे,सौ.मिना पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या शिबिराला डॉ.आ.संजय रायमुलकर,माजी आ.नानाभाऊ कोकरे,यांच्यासह सह अनेक नेते मंडळींनी शिबिराला भेटी दिल्या शिबिरामध्ये महिलामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे होणा-या वृध्द रोगांचे प्रमाण जास्त आढळून आले.दृष्टीकमी झालेले अनेक रूग्ण ऑपरेशन होईल या अपेक्षेने आले होते.पुढील वर्षीपर्यंत ग्रामीण रूग्णालयाचे काम झाल्याचे काम झाल्यास या ठिकाणी ऑपरेशनची व्यवस्था करण्यात येऊ शकेल असे आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,व्यवस्थापक अशोक थोरहाते यांनी यावेळी सांगीतले.

Sunday, 24 November 2013

विवेकानंद ज्ञानपीठामध्ये वक्तृत्व स्पर्धा निमित्य प.पू.शुकदास महाराजांच्या वाढदिवसाचे




विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष कर्मयोगी संन्यासी प.पू.शुकदास महाराज यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्य विवेकानंद ज्ञानपीठ मध्ये १ डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शाळेमध्ये वर्ग सजावट स्पर्धा यांच्यासह विविध स्पर्धा देखील पार पडणार असल्याची माहिती प्राचार्य संगीता चौधरी यांनी माहिती दिली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पाटील सर,विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य पवित्रकार सर,विवेकानंद अपंग निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.गोरे मॅडम,विवेकानंद निवासी कर्ण बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.वाय.शेळके,विश्वस्त अशोक थोरहाते

Saturday, 23 November 2013

पू.शुकदास महाराजांचे आदर्श कार्य -अ‍ॅड.अरूणभाऊ शेळके

शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.अरूणभाऊ शेळके यांनी आज २३ नोव्हेंबर रोजी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट दिली.भेटी समयी त्यांंच्या समवेत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रसिध्द कृषि किर्तनकार महादेवराव भुईभार ,सुभाष जाधव,प्राचार्य डॉ.दामोधर आंभोरे,डॉ.भुसारी,वायाळ,प्रा.सोनुने,प्रा.देव्हडे,प्रा.गवई, प्रा.शेवाळे इत्यादी हजर होते.प्रथम त्यांनी विवेकानंद आश्रमाच्या सर्व सेवाकार्यास भेटी देवून सर्व शिक्षणीक,आध्यात्मीक व आरोग्य सेवा कार्याची पाहणी केली,नंतर कर्मयागी संन्यासी प.पू.शुकदास महाराजांची भेट घेवून जवळपास एक तास चर्चा केली.त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.गेल्या ३० वर्षांपासून महाराजांचे कार्य जाणून असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने सचिव संतोष गोरे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार केला.याप्रसंगी आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते,व्यवस्थापक अशोक थोरहाते,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,मा.बा. केंदळे तथा आश्रमाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Sunday, 17 November 2013

शुकदास महाराजांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू

शुकदास महाराजांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू
भव्य रोगनिदान शिबीराचे आयोजन,१०० तज्ञ डॉक्टरांचा सहभाग 

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष शुकदास महाराजांचा वाढदिवस दरवर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला अत्यंत भक्ती भावाने व उत्साहाने संपन्न केल्या जातो. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.यावर्षी दि.१ डिसेंबर रविवारला महाराजांचा वाढदिवस येत आहे. त्यानिमित्त भव्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ नागपूर ,एन.के.पी.साळवे मेडिकल कॉलेज व लता मंगेशकर रूग्णालय नागपूर आणि विवेकानंद आश्रम यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजीत केले आहे. या शिबिरात मुंबई,नागपूर,अमरावती ,बुलडाणा,वाशिम येथील वरिष्ठ तज्ञ १०० डॉक्टर आपल्या सेवा देणार आहेत.शिबिरातुन ऑपरेशनकरिता निवडलेल्या सर्व पेशंटला नागपूर येथील लता मंगेशकर रूग्णालय तसेच शासकिय रूग्णालयामध्ये मोफत ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ नागपूर चे अध्यक्ष नामदेवराव सास्ते प्रमुख समन्वयक डॉ.विठ्ठल दांडगे,डॉ.विकास बाहेकर,संयोजक शरद राठी तसेच विवेकानंद आश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.नितीन पवार,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे. किमान २५ हजार रूग्ण या शिबिराचा लाभ घेतील असा अंदाज त्यांनी हयावेळी बोलतांना व्यक्त केला.अत्यंत भव्य प्रमाणात संपन्न होत असलेल्या या शिबिराचे तयारी सुरू झाली असून जनरल फिजीशियन,जनरल सर्जन,स्त्रिरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ,अस्थिरोग तज्ञ,चर्मरोग तज्ञ,कान,नाक घसा तज्ञ, मुत्ररोग तज्ञ, आहारा तज्ञ, हृदयरोग तज्ञ, अस्थमा व अलर्जी तज्ञ,मधुमेह तज्ञ, गॅस्टड्ढोएन्टोरॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, लॅप्रोस्कोपिस्ट, बालशस्त्रक्रिया तज्ञ, अल्टड्ढासोनोलॉजिस्ट, न्युरॉलॉजिस्ट, कॅन्सर तज्ञ, रक्तरोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, क्षयरोग तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, बालदमा विशेषतज्ञ, सेक्सरोग तज्ञ, भौतिक उपचार तज्ञ, न्युरोसर्जन ,पॅथॉलॉलिस्ट, युरोसर्जन, आयुर्वेद तज्ञ, होमिओपॅथी तज्ञ, इत्यादीरोगासंबधी रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी विविध समितांचे गठन करण्यात आले असून शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे.रूग्ण नोंदणी विवेकानंद आश्रमाच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली आहे. शिबिरासोबतच संस्थेच्या शाळा महाविद्यालयतील विद्याथ्र्यांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.व्यासपीठावर होणा-या कार्यक्रमात सायंकाळी भक्तीगीत गायन,महाराजश्रींचे अभिष्ठचिंतन व मनोगत संपन्न होईल.कार्यक्रमाचा शेवट विवेकानंद जयंती महोत्सव २०१४ च्या आयोजनासाठी संपन्न होणा-या उत्सव समितीच्या सभेने होईल. जास्तित जास्त रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रमा तर्फे करण्यात आले.


Monday, 4 November 2013

विवेकानंद आश्रमात भगवान धन्वंतरी पुजन उत्साहात साजरी



दिवाळीची सुरूवात धवत्रयोदशी या दिवसापासून होते.धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीचे पुजन करण्यात येते.सर्वांना आरोग्य लाभावे व सर्व समाज बलशाली असावा यासाठी भगवान धन्वंतरीचे पुजन केल्या जाते.कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रमात भगवान धन्वंतरीचे पुजन आज दि.१ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.भगवान धन्वंतरीचे पुजन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,प्रा.कैलास भिसडे,विश्वभंर शेळके,राज रौंदळकर,पुरूषोत्तम आकोटकर आदी उपस्थित होते. तदनंतर कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांचे पुजन करण्यात आले.

विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट

जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.श्याम देशपांडे यांनी आज दि.३ नोव्हेंबर २०१३ रोजी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट दिली.यावेळी विवेकानंद आश्रमद्वारा संचालित सर्व सेवा उपक्रमांना त्यांनी भेटी दिल्या.कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्रींशी विविध विषयांवर चर्चा केली."जनसामान्याचे दुःख दुरू करून त्यांची अहर्निश सेवा करण्याचे महाराजश्रींचे जीवनकार्य ही ईश्वरीसेवाच आहे'असे गौरोदगार त्यांनी काढले.
विवेकानंद आश्रमाचे वतीने त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पू.महाराजश्री रचित ग्रंथ भेट देवून यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,शशिकांत बेंदाडे,पुरूषोत्तम आकोटकर,उल्हास देशपांडे,डॉ.नितीन पवार उपस्थित होते.

Saturday, 5 October 2013

हिवरा आश्रम येथे पर्यटन विकासांतर्गत विकास कामांना प्रारंभ

हिवरा आश्रम येथे पर्यटन विकासांतर्गत विकास कामांना प्रारंभ
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज हे विकासात्मक दृष्टीकोन असलेले आधुनिक संत आहेत.बुलडाणा जिल्हात येणारे पर्यटक हे अंजिठा,लोणार या पर्यटन स्थळांना भेटी देतात.या दोन्ही स्थळांना जोडणा-या मार्गावर हिवरा आश्रम हे गाव येते.शैक्षणिक हब असलेले हे ठिकाण ‘ब' दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे.आरोग्य तपासणीसाठी राज्यभरातुन रूग्ण या ठिकाणी येतात. पर्यटन विकास सुविधा निर्माण करण्यास येथे भरपूर वाव आहे, या बाबींचा विचार करून संस्थेने पर्यटन विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. कोराडी जलाशयातील बेटावर पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे ,पर्यटकांसाठी विश्रामगृह,रस्ते इत्यादीसाठी पर्यटन विभागाने १ कोटी रूपये मंजूर केले आहे.या कामांतर्गत विश्रामगृहासाठीच्या कामाचे स्थळ निरिक्षणासाठी आज दि.६ ऑक्टोबर रोजी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बी.डी.ठेंग यांनी स्थळ निरिक्षण केले. या प्रसंगी त्यांचेसोबत उपविभागीय अभियंता पाटील,कनिष्ठ अभियंता गुलाब शेळके,संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते उपस्थित होते.विश्रमागृह व इतर सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांना निवासाची व्यवस्था होऊ शकेल. निर्सगरम्य परिसर,सुदर जलाशय,पवित्र वातावरण यामुळे हे पर्यटन स्थळ पर्यटकांना निश्चितच आनंददायी ठरणारे आहे.

Thursday, 3 October 2013

विवेकानंद आश्रमात जेष्ठ नागरिक दिन साजरा


जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करतांना आत्मानंद थोरहाते

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात ज्येष्ठ नागरिक दिन दि.१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.यावेळी परिसरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.आनंदमय वातावरणात पार पडलेल्या हया कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये होते.यावेळी जमलेल्या सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळींचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची नव्या पीढीसाठी गरज असून सध्या देशाचे चालकही ज्येष्ठ मंडळीच आहेत.त्यामुळे वृध्दत्व ही अडचण नाही तर अनुभवाचे भांडार आहे असे विचार पाध्ये यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे.ज्या देशात वृध्दांची संख्या जास्त त्या देशात मार्गदर्शन,संस्कार व अनुभव संपन्नता येते .ज्येष्ठांना समजून घेतांना त्यांच्या शारिरीक स्वास्थाकडेच अधिक लक्ष द्यावे लागेल.विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांना आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्तीनाथ येवले शास्त्री महाराज यांनी शरीराच्या अवस्था व त्यामधील कर्तव्य आणि अध्यात्म यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्र संचालन आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी केले व आभारप्रदर्शन संजाबराव सवडतकर यांनी केले.कार्यक्रमासाठी आश्रमाचे विश्वस्त अशोकभाऊ थोरहाते,प्रा.कैलास भिसडे,तसेच आश्रमाचे कार्यकर्ते शे.ना.दळवी,र.बा.मालपाणी,भिमराव शेळके,शिवाजीराव घोंगडे,सखाराम शेळके,भाष्कर वायाळ,उत्तमराव काळे,अर्जूनराव गारोळे, व परिसरातील बहूसंख्य ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 2 October 2013

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींची रूग्णसेवा दि.५ ऑक्टोबर २०१३ पासून पूर्ववत सुरू होणार


 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींची रूग्णसेवा दि.५ ऑक्टोबर २०१३ पासून पूर्ववत सुरू होणार
∙मागील आठवडयात दोन्ही डोळ्यांवर झाली होती शस्त्रक्रिया




विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणा-या विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष व आपल्या रूग्णसेवेव्दारा सव्वाकोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री आपली रूग्णसेवा दि.५ ऑक्टोंबर २०१३ पासून पूर्ववत सुरू करणार आहेत.पू.महाराजश्रींना गेल्या चाळीस वर्षापासून मधुमेहाचा त्रास आहे.अविरत सेवेत असल्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे महाराजांना लक्ष देता आले नाही.पू महाराजश्रींच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदूचा त्रास होता.त्यामुळे दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय महाराजश्रींनी घेतला. त्यासाठी दि.१६ सप्टेंबर २०१३ रोजी पू.महाराजश्री व आश्रमाच्या पदाधिका-यांनी नागपूर येथे प्रस्थान केले.यावेळी नागपूर येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी दि.१८.९.२०१३ रोजी डाव्या डोळ्यावर व दि.२५.९.२०१३ रोजी उजव्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. नागपूर येथील आश्रमाचे कार्यकर्ते श्री.अनिलराव शेटे यांच्या घरी पू.महाराजश्रींची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. दि.२७ .०९.२०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता पू.महाराजश्रींचे आश्रमात आगमन झाले. तब्बल बारा दिवस! पहिल्यांदाच पू.महाराजश्री एवढे दिवस विवेकानंद आश्रमापासून दूर राहिले. विवेकानंद आश्रमात आगमन प्रसंगी आश्रमाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ,शैक्षणिक संस्थेचे सर्व कर्मचारी बंधू,गावकरी बंधू मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी श्रध्देने व भावपूर्ण होवून पुष्पवर्षांव करून पू.महाराजश्रींच्या आगमनाचा आनंद साजरा केला.शस्त्रक्रिया झाल्यामुळे डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होवू नये, म्हणून किमान एक आठवडाभर तरी पू.महाराजश्रींनी विश्रांती घ्यावी असा सल्लाच पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी दिलेला आहे. त्यामुळे दि.५ ऑक्टोंबर २०१३ पासून पू.महाराजश्रींची रूग्णसेवा पूर्ववत सुरू होईल असे विवेकानंद आश्रमाचे सचिव श्री.संतोष गोरे यांनी कळविले आहे.