Monday, 16 December 2013

अपंगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा हिवरा आश्रम येथे संपन्न !




समाज कल्याण विभाग, जि.प.बुलडाणा व विवेकानंद आश्रम, हिवरा यांचे सयुक्त विद्यमाने दि.१६/१२/२०१३रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. सदर क्रिडा स्पर्धेला कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांनी आर्शिवाद दिले. स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद कृषि व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एकनाथ पाटील यांचे हस्ते तर डॉ.पवित्रकार प्राचार्य कृषि महाविद्यालय यांचे अध्यक्षेतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.एस.एस.नागापूरकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बुलडाणा, श्री. एस.एम.पुंड सहाय्यक सल्लागार अपंग विभाग जि.प.बुलडाणा, विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते, प्राचार्य श्री.करोडदे, श्री.म्हस्के, श्री.लाव्होळे, श्री.अग्रवाल, श्री.शेख, श्री. उबरहांडे, श्री.अंदुरकर, सौ.साऊरकर, सौ.गोरे, श्री. शेळके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय अपंग स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून प्राचार्य डॉ.पाटील व मान्यवरांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. सदर क्रिडा स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अपंग शाळा उपस्थित होत्या. त्यामध्ये कर्णबधिरांच्या हिवरा आश्रम, खामगाव, बुलडाणा, चांडोळ, लोणार, मलकापूर, दे.मही इत्यादी तर अस्थिव्यंगांच्या हिवरा आश्रम, मेहकर, डोणगाव, चिखली, दे.मही,शेगाव, पातुर्डा इत्यादी तर मतिमंदाच्या खामगाव, बुलडाणा, शेगाव इत्यादी व अंधाची बुलडाणा येथील अंध शाळा उपस्थित होती. सदर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अपंगाच्या कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद,अंध व बहुविकलांक प्रवर्गातील मुला-मुलीसाठी खालील क्रिडास्पर्धा संपन्न झाल्या कर्णबधिर ५०,१००,५००मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, १०० मी. पोहणे इत्यादी अस्थिव्यंग ५०,१०० मी., सॉफ्ट बॉल थ्रो, व्हील चेअर इत्यादी बहुविकलांगासाठी लगोरी फोडणे, बाटलीत बाल टाकणे, २५ मी. चालणे इत्यादी, मतिमंदसाठी ५० मी. धावणे, गोळा फेक, स्पॉट जम्प, सॉफ्ट बॉल थ्रो अंधासाठी बुध्दीबळ स्पर्धा, गोळा फेक,२५,५०,,१०० मी. धावणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजयी झालेल्या स्पर्धकाची निवड राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी करण्यात आली. राज्यस्तरीय अपंगाच्या क्रिडा स्पर्धा दि.३ जानेवारी ते ५ जानेवारी २०१३ रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित केल्या असून तेथे निवड झालेल्या खेडाळूना खेण्याची संधी मिळणार आहे.सदर क्रिडा स्पर्धेचे प्रास्ताविक समन्वयक प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सुनिता गोरे यांनी केले. जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभाग, जि.प.बुलडाणा व जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या अपंग शाळा तथा विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी व अपंग कर्णबधिर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेवून जिल्हास्तरीय अपंगाच्या क्रिडा स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केल्या.

No comments:

Post a Comment