विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नागपूर येथील बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ एन.के.पी.साळवे मेडीकल कॉलेज नागपूर व लता मंगेशकर रूग्णालय नागपूर आणि विवेकानंद आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले.होते.३० नोव्हेंबर रोजी रात्री १२५ डॉक्टरांचा चमू विवेकानंद आश्रमात दाखल झाला होता.या शिबिराचा लाभ परिसरातील दहा हजाराहून अधिक रूग्णांनी घेतला.
सकाळी ८ शिबिराला सुरूवात झाली या शिबिराचे उद्घाटन प.पू.शुकदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुलडाणा जिल्हा नागरिक जिल्हा नागरिक मंडळ नागपूरचे अध्यक्ष डॉ.नामदेवराव सास्ते ,सचिव प्रा.गणेश केदार,संयोजक शरद राठी,प्रमुख समन्वयक डॉ.विठ्ठलराव दांडगे,सदस्य डॉ.राम जोशी ,सचिव विद्या शिक्षण प्रसारक मंडळ डॉ.अमोल देशमुख ,डॉ.देवके,डॉ.जगदिश कोठारी ,भारती सेवा मंडळ नागपूरचे राम आखरे,राजे सावळे,सौ.मिना पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या शिबिराला डॉ.आ.संजय रायमुलकर,माजी आ.नानाभाऊ कोकरे,यांच्यासह सह अनेक नेते मंडळींनी शिबिराला भेटी दिल्या शिबिरामध्ये महिलामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे होणा-या वृध्द रोगांचे प्रमाण जास्त आढळून आले.दृष्टीकमी झालेले अनेक रूग्ण ऑपरेशन होईल या अपेक्षेने आले होते.पुढील वर्षीपर्यंत ग्रामीण रूग्णालयाचे काम झाल्याचे काम झाल्यास या ठिकाणी ऑपरेशनची व्यवस्था करण्यात येऊ शकेल असे आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,व्यवस्थापक अशोक थोरहाते यांनी यावेळी सांगीतले.
No comments:
Post a Comment