Sunday, 17 November 2013

शुकदास महाराजांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू

शुकदास महाराजांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू
भव्य रोगनिदान शिबीराचे आयोजन,१०० तज्ञ डॉक्टरांचा सहभाग 

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष शुकदास महाराजांचा वाढदिवस दरवर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला अत्यंत भक्ती भावाने व उत्साहाने संपन्न केल्या जातो. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.यावर्षी दि.१ डिसेंबर रविवारला महाराजांचा वाढदिवस येत आहे. त्यानिमित्त भव्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ नागपूर ,एन.के.पी.साळवे मेडिकल कॉलेज व लता मंगेशकर रूग्णालय नागपूर आणि विवेकानंद आश्रम यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजीत केले आहे. या शिबिरात मुंबई,नागपूर,अमरावती ,बुलडाणा,वाशिम येथील वरिष्ठ तज्ञ १०० डॉक्टर आपल्या सेवा देणार आहेत.शिबिरातुन ऑपरेशनकरिता निवडलेल्या सर्व पेशंटला नागपूर येथील लता मंगेशकर रूग्णालय तसेच शासकिय रूग्णालयामध्ये मोफत ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ नागपूर चे अध्यक्ष नामदेवराव सास्ते प्रमुख समन्वयक डॉ.विठ्ठल दांडगे,डॉ.विकास बाहेकर,संयोजक शरद राठी तसेच विवेकानंद आश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.नितीन पवार,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे. किमान २५ हजार रूग्ण या शिबिराचा लाभ घेतील असा अंदाज त्यांनी हयावेळी बोलतांना व्यक्त केला.अत्यंत भव्य प्रमाणात संपन्न होत असलेल्या या शिबिराचे तयारी सुरू झाली असून जनरल फिजीशियन,जनरल सर्जन,स्त्रिरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ,अस्थिरोग तज्ञ,चर्मरोग तज्ञ,कान,नाक घसा तज्ञ, मुत्ररोग तज्ञ, आहारा तज्ञ, हृदयरोग तज्ञ, अस्थमा व अलर्जी तज्ञ,मधुमेह तज्ञ, गॅस्टड्ढोएन्टोरॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, लॅप्रोस्कोपिस्ट, बालशस्त्रक्रिया तज्ञ, अल्टड्ढासोनोलॉजिस्ट, न्युरॉलॉजिस्ट, कॅन्सर तज्ञ, रक्तरोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, क्षयरोग तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, बालदमा विशेषतज्ञ, सेक्सरोग तज्ञ, भौतिक उपचार तज्ञ, न्युरोसर्जन ,पॅथॉलॉलिस्ट, युरोसर्जन, आयुर्वेद तज्ञ, होमिओपॅथी तज्ञ, इत्यादीरोगासंबधी रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी विविध समितांचे गठन करण्यात आले असून शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे.रूग्ण नोंदणी विवेकानंद आश्रमाच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली आहे. शिबिरासोबतच संस्थेच्या शाळा महाविद्यालयतील विद्याथ्र्यांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.व्यासपीठावर होणा-या कार्यक्रमात सायंकाळी भक्तीगीत गायन,महाराजश्रींचे अभिष्ठचिंतन व मनोगत संपन्न होईल.कार्यक्रमाचा शेवट विवेकानंद जयंती महोत्सव २०१४ च्या आयोजनासाठी संपन्न होणा-या उत्सव समितीच्या सभेने होईल. जास्तित जास्त रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रमा तर्फे करण्यात आले.


No comments:

Post a Comment