जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करतांना आत्मानंद थोरहाते |
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात ज्येष्ठ नागरिक दिन दि.१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.यावेळी परिसरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.आनंदमय वातावरणात पार पडलेल्या हया कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये होते.यावेळी जमलेल्या सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळींचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची नव्या पीढीसाठी गरज असून सध्या देशाचे चालकही ज्येष्ठ मंडळीच आहेत.त्यामुळे वृध्दत्व ही अडचण नाही तर अनुभवाचे भांडार आहे असे विचार पाध्ये यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे.ज्या देशात वृध्दांची संख्या जास्त त्या देशात मार्गदर्शन,संस्कार व अनुभव संपन्नता येते .ज्येष्ठांना समजून घेतांना त्यांच्या शारिरीक स्वास्थाकडेच अधिक लक्ष द्यावे लागेल.विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांना आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्तीनाथ येवले शास्त्री महाराज यांनी शरीराच्या अवस्था व त्यामधील कर्तव्य आणि अध्यात्म यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्र संचालन आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी केले व आभारप्रदर्शन संजाबराव सवडतकर यांनी केले.कार्यक्रमासाठी आश्रमाचे विश्वस्त अशोकभाऊ थोरहाते,प्रा.कैलास भिसडे,तसेच आश्रमाचे कार्यकर्ते शे.ना.दळवी,र.बा.मालपाणी,भिमराव
No comments:
Post a Comment