Wednesday, 2 October 2013

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींची रूग्णसेवा दि.५ ऑक्टोबर २०१३ पासून पूर्ववत सुरू होणार


 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींची रूग्णसेवा दि.५ ऑक्टोबर २०१३ पासून पूर्ववत सुरू होणार
∙मागील आठवडयात दोन्ही डोळ्यांवर झाली होती शस्त्रक्रिया




विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणा-या विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष व आपल्या रूग्णसेवेव्दारा सव्वाकोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री आपली रूग्णसेवा दि.५ ऑक्टोंबर २०१३ पासून पूर्ववत सुरू करणार आहेत.पू.महाराजश्रींना गेल्या चाळीस वर्षापासून मधुमेहाचा त्रास आहे.अविरत सेवेत असल्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे महाराजांना लक्ष देता आले नाही.पू महाराजश्रींच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदूचा त्रास होता.त्यामुळे दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय महाराजश्रींनी घेतला. त्यासाठी दि.१६ सप्टेंबर २०१३ रोजी पू.महाराजश्री व आश्रमाच्या पदाधिका-यांनी नागपूर येथे प्रस्थान केले.यावेळी नागपूर येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी दि.१८.९.२०१३ रोजी डाव्या डोळ्यावर व दि.२५.९.२०१३ रोजी उजव्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. नागपूर येथील आश्रमाचे कार्यकर्ते श्री.अनिलराव शेटे यांच्या घरी पू.महाराजश्रींची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. दि.२७ .०९.२०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता पू.महाराजश्रींचे आश्रमात आगमन झाले. तब्बल बारा दिवस! पहिल्यांदाच पू.महाराजश्री एवढे दिवस विवेकानंद आश्रमापासून दूर राहिले. विवेकानंद आश्रमात आगमन प्रसंगी आश्रमाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ,शैक्षणिक संस्थेचे सर्व कर्मचारी बंधू,गावकरी बंधू मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी श्रध्देने व भावपूर्ण होवून पुष्पवर्षांव करून पू.महाराजश्रींच्या आगमनाचा आनंद साजरा केला.शस्त्रक्रिया झाल्यामुळे डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होवू नये, म्हणून किमान एक आठवडाभर तरी पू.महाराजश्रींनी विश्रांती घ्यावी असा सल्लाच पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी दिलेला आहे. त्यामुळे दि.५ ऑक्टोंबर २०१३ पासून पू.महाराजश्रींची रूग्णसेवा पूर्ववत सुरू होईल असे विवेकानंद आश्रमाचे सचिव श्री.संतोष गोरे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment