हिवरा आश्रम येथे पर्यटन विकासांतर्गत विकास कामांना प्रारंभ

हिवरा आश्रम येथे पर्यटन विकासांतर्गत विकास कामांना प्रारंभ
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज हे
विकासात्मक दृष्टीकोन असलेले आधुनिक संत आहेत.बुलडाणा जिल्हात येणारे
पर्यटक हे अंजिठा,लोणार या पर्यटन स्थळांना भेटी देतात.या दोन्ही स्थळांना
जोडणा-या मार्गावर हिवरा आश्रम हे गाव येते.शैक्षणिक हब असलेले हे ठिकाण
‘ब' दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे.आरोग्य तपासणीसाठी
राज्यभरातुन रूग्ण या ठिकाणी येतात. पर्यटन विकास सुविधा निर्माण करण्यास
येथे भरपूर वाव आहे, या बाबींचा विचार करून संस्थेने पर्यटन विभागाकडे
प्रस्ताव दाखल केला होता. कोराडी जलाशयातील बेटावर पर्यटकांसाठी सुविधा
निर्माण करणे ,पर्यटकांसाठी विश्रामगृह,रस्ते इत्यादीसाठी पर्यटन विभागाने १
कोटी रूपये मंजूर केले आहे.या कामांतर्गत विश्रामगृहासाठीच्या कामाचे
स्थळ निरिक्षणासाठी आज दि.६ ऑक्टोबर रोजी बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता श्री.बी.डी.ठेंग यांनी स्थळ निरिक्षण केले. या प्रसंगी त्यांचेसोबत
उपविभागीय अभियंता पाटील,कनिष्ठ अभियंता गुलाब शेळके,संस्थेचे उपाध्यक्ष
अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद
थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते उपस्थित होते.विश्रमागृह व इतर सुविधा
उपलब्ध झाल्यास पर्यटकांना निवासाची व्यवस्था होऊ शकेल. निर्सगरम्य
परिसर,सुदर जलाशय,पवित्र वातावरण यामुळे हे पर्यटन स्थळ पर्यटकांना
निश्चितच आनंददायी ठरणारे आहे.
No comments:
Post a Comment