Friday, 20 December 2013

विवेकानंद अपंग शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरावर



दि.१६ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आलेल्या अपंगाच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत विवेकानंद आश्रम व्दारा संचालित, विवेकानंद निवासी अपंग विद्यालयातील ६ विद्याथ्र्यांनी वेगवेगळया खेळ प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी पात्रता मिळवली. दि.१६.१२.२०१३ रोजी विवेकानंद आश्रमाच्या भव्य क्रिडांगणावर या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन जिल्हा समाज कल्याण विभाग,जिल्हा कल्याण जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले होते. या स्पर्धांमध्ये अपंग विद्यालयातील अनिल दत्तात्रय शिंदे ५० मीटर व १०० मि या खेळप्रकारात प्रथम, कु.शिवानी संदीप अंभोरे ५० मि व १०० मि. धावणे खेळप्रकारात प्रथम, महेश माणिकराव चोखट २५ मि.धावणे प्रथम,विष्णु अंकुश अजगर १०० मि. धावणे या खेळप्रकारात प्रथम,कु.दिपाली समाधान घोडक ५० मि. व्हीलचेअर रेस व व्हिलचेअवर बसून सॉफ्ट बॉल थ्रो या खेळप्रकारात प्रथम तर कु.आरती बंडु जाधव २५ मि.भरभर चालणे या खेळप्रकारात प्रथम येवून ३ ते ५ जानेवारी २०१४ ला अमरावती येथे होणा-या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी प्रात्रता मिळवली .या यशाबदल आश्रमाचे अध्यक्ष प.पू.शुकदास महाराजांनी मुलांचे अभिनंदन केले व पुढे होणा-या स्पर्धेत यशाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका तसेच विवेकानंद निवासी अपंग विद्यालय व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी मुलांच्या यशासाठी परिश्रम घेतले.

Monday, 16 December 2013

अपंगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा हिवरा आश्रम येथे संपन्न !




समाज कल्याण विभाग, जि.प.बुलडाणा व विवेकानंद आश्रम, हिवरा यांचे सयुक्त विद्यमाने दि.१६/१२/२०१३रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. सदर क्रिडा स्पर्धेला कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांनी आर्शिवाद दिले. स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद कृषि व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एकनाथ पाटील यांचे हस्ते तर डॉ.पवित्रकार प्राचार्य कृषि महाविद्यालय यांचे अध्यक्षेतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.एस.एस.नागापूरकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बुलडाणा, श्री. एस.एम.पुंड सहाय्यक सल्लागार अपंग विभाग जि.प.बुलडाणा, विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते, प्राचार्य श्री.करोडदे, श्री.म्हस्के, श्री.लाव्होळे, श्री.अग्रवाल, श्री.शेख, श्री. उबरहांडे, श्री.अंदुरकर, सौ.साऊरकर, सौ.गोरे, श्री. शेळके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय अपंग स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून प्राचार्य डॉ.पाटील व मान्यवरांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. सदर क्रिडा स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अपंग शाळा उपस्थित होत्या. त्यामध्ये कर्णबधिरांच्या हिवरा आश्रम, खामगाव, बुलडाणा, चांडोळ, लोणार, मलकापूर, दे.मही इत्यादी तर अस्थिव्यंगांच्या हिवरा आश्रम, मेहकर, डोणगाव, चिखली, दे.मही,शेगाव, पातुर्डा इत्यादी तर मतिमंदाच्या खामगाव, बुलडाणा, शेगाव इत्यादी व अंधाची बुलडाणा येथील अंध शाळा उपस्थित होती. सदर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अपंगाच्या कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद,अंध व बहुविकलांक प्रवर्गातील मुला-मुलीसाठी खालील क्रिडास्पर्धा संपन्न झाल्या कर्णबधिर ५०,१००,५००मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, १०० मी. पोहणे इत्यादी अस्थिव्यंग ५०,१०० मी., सॉफ्ट बॉल थ्रो, व्हील चेअर इत्यादी बहुविकलांगासाठी लगोरी फोडणे, बाटलीत बाल टाकणे, २५ मी. चालणे इत्यादी, मतिमंदसाठी ५० मी. धावणे, गोळा फेक, स्पॉट जम्प, सॉफ्ट बॉल थ्रो अंधासाठी बुध्दीबळ स्पर्धा, गोळा फेक,२५,५०,,१०० मी. धावणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजयी झालेल्या स्पर्धकाची निवड राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी करण्यात आली. राज्यस्तरीय अपंगाच्या क्रिडा स्पर्धा दि.३ जानेवारी ते ५ जानेवारी २०१३ रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित केल्या असून तेथे निवड झालेल्या खेडाळूना खेण्याची संधी मिळणार आहे.सदर क्रिडा स्पर्धेचे प्रास्ताविक समन्वयक प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सुनिता गोरे यांनी केले. जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभाग, जि.प.बुलडाणा व जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या अपंग शाळा तथा विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी व अपंग कर्णबधिर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेवून जिल्हास्तरीय अपंगाच्या क्रिडा स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केल्या.

मुक्तीसाठी नामस्मरण-ह.भ.प. राजु महाराज खराडे


कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर एकादशीनिमित्त १३ डिसेंबर रोजी ह.भ.प. राजु महाराज खराडे यांचे किर्तनाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.यावेळी ह.भ.प. बालकिर्तनकार राजु महाराज खराडे यांनी तुका म्हणे जपा।मंत्र त्रिक्षरी सोपा। या अभंगाचे निरूपन करतांना नामस्मरणाचे महत्व विषद केले.निरूपन करतांना ते पुढे म्हणाले की, भक्त प्रल्हाद,दामोपंत ,सावता माळी यांच्या नामस्मरणा संबंधीचे उदाहरणे देवून नामाचे श्रेष्ठत्व,नामाची महती,नामस्मरण घेतल्याने होणारा जीवनाचा उध्दार,यासाठी सोपा उपाय म्हणजे ‘तुका म्हणे जपा। मंत्र त्रिक्षरी विठ्ठल नामाचे नामस्मरण हे सोपे साधन उपाय आहे. या धकाधकीच्या जीवनात योग ,ज्ञान,उपसाना,कर्मकांड करणे सहज होऊ शकत नाही म्हणून नामस्मरण करावे.एकादशिनिमित्त विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर झालेल्या किर्तनात ह.भ.प. राजु खराडे महाराजांनी गीता जयंती व एकादशीनिमित्त किर्तन व गीतेचे महत्व उपस्थितांना पटवून दिली.या कार्यक्रमाला गावकरी व परिसरातील बहुसंख्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 4 December 2013

उपाध्यांचे ओझे कमी करा,तुम्ही सुखी व्हाल-प.पू.शुकदास महाराज

येथील विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष कर्मयोगी संन्याशी प.पू.शुकदास महाराजांचा ७० वा वाढदिवस सोहळा मोठया आनंदाने व भक्ती भावाने १ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.सकाळपासून राज्याच्या कान्याकोप-यातुन आलेल्या हजारो भाविक भक्तांनी विवेकानंद आश्रमात एकच गर्दी केली होती त्यामुळे हिवरा आश्रम परिसर फुलून गेला होता.यावेळी अनेक मान्यवरांनी दिवसभरात महाराजश्रींची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.सायंकाळी व्यासपीठावर झालेल्या अभिष्ठचिंतन सोहळयाची सुरूवात आश्रमाचे गायक वृंद गजाननदादा निकम,सज्जनसिंग राजपूत,शाहीर ईश्वरदादा मगर,आकाशवाणी कलावंत सुभाष सवडतकर,प्रा.अभय मासोदकर,शशिकांत बेंदाडे यांनी ''ब्रम्हरूपा जय ब्रम्हरूपा शुन्यामधून विश्व निर्मीले हिव-याच्या शुकदासांनी'' या गाण्याने व्यासपीठ दणाणून सोडले. सायंकाळी व्यासपीठावर महाराजांचे अभिष्ठचिंतन करण्यात आले.यावेळी उपस्थिानांना आशिर्वादवर बोलतांना प.पू.महाराजश्री पुढे बोलतांना म्हणाले की,‘‘ कृषि पंपाने ओढल्या गेलेले पाणी,बाहेर फेकल्या गेले पाहिजे,नाहीतर पंप गरम होवून बंद पडू शकतो. सोडलेले पाणी अनाठाई जावू नये, त्याचा उपयोग लोकांना पाणी पिण्यासाठी व शेतीतील उत्पादन वाढीसाठी व्हावा. पैसे कोणीच खात नाही. जास्तीच्या उपभोगाने अनेक रोग जडतात. वाढीव संपत्तीचा उपयोग थोडाफार तरी दुस-यासाठी व्हावा. ‘अंती देहसुद्धा सोबत येवू शकत नाही.पुढे बोलतांना ते म्हणाले की,‘‘एका शतका आतील जगणा-यांनी हजारो वर्षांचा निरर्थक विचार करणे हास्यास्पद आहे! एवढा आटापिटा कशासाठी? तुमच्या चेह-यावरचं हास्य, समाधान, शांती, आनंद, सुख तुम्हीं गमावून बसलेले आहात. कंजुषी आणि मतलबामुळे माणूस समाजातून एकाकी पडतो. उपाध्यांचे ओझे कमी केल्या शिवाय, मनुष्याला ‘मुक्त होता येत नाही. ‘सौंदर्य हे बाहेर असते, आणि आतले असते ते ‘औदार्य!
सध्या ‘मी ज्या देहामध्ये थांबलो आहे, त्यातून बाहेर पडेपर्यंत तुमच्या सेवेत आहेच.आशिर्वचनानंतर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.तसेच वृध्द आश्रमाती २५ वृध्द ,स्त्री पुरूषांना कपडे वाटप करण्यात आले.या वाढदिवस शुभचिंतन सोहळयाचे रसाळ आणि भावपूर्ण तथा अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन गजाननदादा शास्त्री महाराज यांनी केले.त्यानंतर शेवटी दि.२१,२२,२३ जानेवारी २०१४ रोजी संपन्न होत असलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाच्या उत्सव समितीची सभा संपन्न झाली.
अनेक मान्यवरांनी प.पू.शुकदास महाराजांचे पुष्पहारांनी पूजन केले यामध्ये आ.डॉ.संजय रायमुलकर,माजी मंत्री सुबोध सावजी,माजी आमदार नानाभाऊ कोकरे,रा.का.च्या महिला तालुका अध्यक्ष आशाताई झोरे,जि.प.सदस्य बाळासोहब दराडे,आश्रमाचे उपध्याक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त कैलास भिसडे,व्यवस्थापक अशोक थोरहाते,अ‍ॅड किशोर धोंडगे ,प्राचार्य डॉ.एकनाथ पाटील,पवित्रकार,पंढरीनाथ शेळके,जे.डी.सोळंकी,संत शुकदास पत संस्थेचे अध्यक्ष तथा हरिहरतीर्थाचे व्यवस्थापक पुरूषोत्तम आकोटकर,सुनिता गोरे,सौ.संगीता चौधरी,प्रा.प्रशांत पडघान ,जि.के.ठाकरे,मनोज मु-हेकर,उपसरपंच मनोहर गि-हे पाटील,तंटामुक्त अध्यक्ष संजय वडतकर,अशोक गिèहे,डी.पी.मिसाळ,राज्य संघटक संजय दुणगू,अनंत शेळके,शिक्षकपत संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र मोरे,भगवान राईतकर,प्रमोद सावरकर,शशिकांत बेंदाडे,माजी विश्वस्त मा.बा.केंदळे,मंडळाधिकारी विजय पिंपरकर,साळुंके,तलाठी राजेंद्र आव्हाळे ,ग्रामसेवक सदाशिव म्हस्के,माजी सरपंच जगन्नाथ जवंजाळ,मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी धोंडगे,प्रमोद रायमुलकर,प्रकाश रहाटे,सुनिल काकडे संचालक सुधाकर शिंगणे बालरोगतज्ञ मनिष धातरकर,पत्रकार समाधान म्हस्के आदी हजर होते.



Monday, 2 December 2013

मोफत रोगनिदान शिबिरात दहा हजार रूग्णांनी घेतला लाभ






विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नागपूर येथील बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ एन.के.पी.साळवे मेडीकल कॉलेज नागपूर व लता मंगेशकर रूग्णालय नागपूर आणि विवेकानंद आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले.होते.३० नोव्हेंबर रोजी रात्री १२५ डॉक्टरांचा चमू विवेकानंद आश्रमात दाखल झाला होता.या शिबिराचा लाभ परिसरातील दहा हजाराहून अधिक रूग्णांनी घेतला.
सकाळी ८ शिबिराला सुरूवात झाली या शिबिराचे उद्घाटन प.पू.शुकदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुलडाणा जिल्हा नागरिक जिल्हा नागरिक मंडळ नागपूरचे अध्यक्ष डॉ.नामदेवराव सास्ते ,सचिव प्रा.गणेश केदार,संयोजक शरद राठी,प्रमुख समन्वयक डॉ.विठ्ठलराव दांडगे,सदस्य डॉ.राम जोशी ,सचिव विद्या शिक्षण प्रसारक मंडळ डॉ.अमोल देशमुख ,डॉ.देवके,डॉ.जगदिश कोठारी ,भारती सेवा मंडळ नागपूरचे राम आखरे,राजे सावळे,सौ.मिना पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या शिबिराला डॉ.आ.संजय रायमुलकर,माजी आ.नानाभाऊ कोकरे,यांच्यासह सह अनेक नेते मंडळींनी शिबिराला भेटी दिल्या शिबिरामध्ये महिलामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे होणा-या वृध्द रोगांचे प्रमाण जास्त आढळून आले.दृष्टीकमी झालेले अनेक रूग्ण ऑपरेशन होईल या अपेक्षेने आले होते.पुढील वर्षीपर्यंत ग्रामीण रूग्णालयाचे काम झाल्याचे काम झाल्यास या ठिकाणी ऑपरेशनची व्यवस्था करण्यात येऊ शकेल असे आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,व्यवस्थापक अशोक थोरहाते यांनी यावेळी सांगीतले.