Saturday, 5 October 2013

हिवरा आश्रम येथे पर्यटन विकासांतर्गत विकास कामांना प्रारंभ

हिवरा आश्रम येथे पर्यटन विकासांतर्गत विकास कामांना प्रारंभ
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज हे विकासात्मक दृष्टीकोन असलेले आधुनिक संत आहेत.बुलडाणा जिल्हात येणारे पर्यटक हे अंजिठा,लोणार या पर्यटन स्थळांना भेटी देतात.या दोन्ही स्थळांना जोडणा-या मार्गावर हिवरा आश्रम हे गाव येते.शैक्षणिक हब असलेले हे ठिकाण ‘ब' दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे.आरोग्य तपासणीसाठी राज्यभरातुन रूग्ण या ठिकाणी येतात. पर्यटन विकास सुविधा निर्माण करण्यास येथे भरपूर वाव आहे, या बाबींचा विचार करून संस्थेने पर्यटन विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. कोराडी जलाशयातील बेटावर पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे ,पर्यटकांसाठी विश्रामगृह,रस्ते इत्यादीसाठी पर्यटन विभागाने १ कोटी रूपये मंजूर केले आहे.या कामांतर्गत विश्रामगृहासाठीच्या कामाचे स्थळ निरिक्षणासाठी आज दि.६ ऑक्टोबर रोजी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बी.डी.ठेंग यांनी स्थळ निरिक्षण केले. या प्रसंगी त्यांचेसोबत उपविभागीय अभियंता पाटील,कनिष्ठ अभियंता गुलाब शेळके,संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते उपस्थित होते.विश्रमागृह व इतर सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांना निवासाची व्यवस्था होऊ शकेल. निर्सगरम्य परिसर,सुदर जलाशय,पवित्र वातावरण यामुळे हे पर्यटन स्थळ पर्यटकांना निश्चितच आनंददायी ठरणारे आहे.

Thursday, 3 October 2013

विवेकानंद आश्रमात जेष्ठ नागरिक दिन साजरा


जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करतांना आत्मानंद थोरहाते

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात ज्येष्ठ नागरिक दिन दि.१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.यावेळी परिसरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.आनंदमय वातावरणात पार पडलेल्या हया कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये होते.यावेळी जमलेल्या सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळींचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची नव्या पीढीसाठी गरज असून सध्या देशाचे चालकही ज्येष्ठ मंडळीच आहेत.त्यामुळे वृध्दत्व ही अडचण नाही तर अनुभवाचे भांडार आहे असे विचार पाध्ये यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे.ज्या देशात वृध्दांची संख्या जास्त त्या देशात मार्गदर्शन,संस्कार व अनुभव संपन्नता येते .ज्येष्ठांना समजून घेतांना त्यांच्या शारिरीक स्वास्थाकडेच अधिक लक्ष द्यावे लागेल.विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांना आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्तीनाथ येवले शास्त्री महाराज यांनी शरीराच्या अवस्था व त्यामधील कर्तव्य आणि अध्यात्म यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्र संचालन आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी केले व आभारप्रदर्शन संजाबराव सवडतकर यांनी केले.कार्यक्रमासाठी आश्रमाचे विश्वस्त अशोकभाऊ थोरहाते,प्रा.कैलास भिसडे,तसेच आश्रमाचे कार्यकर्ते शे.ना.दळवी,र.बा.मालपाणी,भिमराव शेळके,शिवाजीराव घोंगडे,सखाराम शेळके,भाष्कर वायाळ,उत्तमराव काळे,अर्जूनराव गारोळे, व परिसरातील बहूसंख्य ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 2 October 2013

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींची रूग्णसेवा दि.५ ऑक्टोबर २०१३ पासून पूर्ववत सुरू होणार


 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींची रूग्णसेवा दि.५ ऑक्टोबर २०१३ पासून पूर्ववत सुरू होणार
∙मागील आठवडयात दोन्ही डोळ्यांवर झाली होती शस्त्रक्रिया




विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणा-या विवेकानंद आश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष व आपल्या रूग्णसेवेव्दारा सव्वाकोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री आपली रूग्णसेवा दि.५ ऑक्टोंबर २०१३ पासून पूर्ववत सुरू करणार आहेत.पू.महाराजश्रींना गेल्या चाळीस वर्षापासून मधुमेहाचा त्रास आहे.अविरत सेवेत असल्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे महाराजांना लक्ष देता आले नाही.पू महाराजश्रींच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदूचा त्रास होता.त्यामुळे दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय महाराजश्रींनी घेतला. त्यासाठी दि.१६ सप्टेंबर २०१३ रोजी पू.महाराजश्री व आश्रमाच्या पदाधिका-यांनी नागपूर येथे प्रस्थान केले.यावेळी नागपूर येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी दि.१८.९.२०१३ रोजी डाव्या डोळ्यावर व दि.२५.९.२०१३ रोजी उजव्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. नागपूर येथील आश्रमाचे कार्यकर्ते श्री.अनिलराव शेटे यांच्या घरी पू.महाराजश्रींची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. दि.२७ .०९.२०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता पू.महाराजश्रींचे आश्रमात आगमन झाले. तब्बल बारा दिवस! पहिल्यांदाच पू.महाराजश्री एवढे दिवस विवेकानंद आश्रमापासून दूर राहिले. विवेकानंद आश्रमात आगमन प्रसंगी आश्रमाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ,शैक्षणिक संस्थेचे सर्व कर्मचारी बंधू,गावकरी बंधू मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी श्रध्देने व भावपूर्ण होवून पुष्पवर्षांव करून पू.महाराजश्रींच्या आगमनाचा आनंद साजरा केला.शस्त्रक्रिया झाल्यामुळे डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होवू नये, म्हणून किमान एक आठवडाभर तरी पू.महाराजश्रींनी विश्रांती घ्यावी असा सल्लाच पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी दिलेला आहे. त्यामुळे दि.५ ऑक्टोंबर २०१३ पासून पू.महाराजश्रींची रूग्णसेवा पूर्ववत सुरू होईल असे विवेकानंद आश्रमाचे सचिव श्री.संतोष गोरे यांनी कळविले आहे.