कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री संस्थापित, विवेकानंद आश्रमाच्या हरिहरतीर्थावर हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले माणसाच्या मनाला मोहित करणारे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र सतत वाहणा-या पावनजल धारेच्या स्नानामुळे भाविकांना आनंद देणारे हरिहरतीर्थ हे जिल्हायातील भाविकांसाठी अत्यंत श्रध्देचे स्थळ आहे.हरीहरतीर्थावर भगवान बालाजी व आशुतोष भगवान शंकराचे भव्य मंदिरे आहेत.१२ जानेवारी २०१४ ला विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून या परिसरात स्वामी विवेकानंदांच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली.युवकांचे आदर्श असलेले व भारतमातेबदल अत्यंतीक प्रेम असलेल्या स्वामीजींची मूर्ती ही सर्वांसाठी प्रेरणा देत राहील .मूर्तीची स्थापना श्री रवींद्र अवस्थी ,मेहकर यांच्या हस्ते करण्यात येवून श्री नरहरी जोशी महाराज यांनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.
या सोहळयाला मेहकरचे आमदार डॉ.संजयजी रायमूलकर यांनी भेट दिली. या कार्यक्रमात विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव वि.ब.कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोकभाऊ थोरहाते,ना.मा.भारस्कर,के.के.भिसडे,व अशोक गि-हे इत्यादी उपस्थित होते.महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थीनींनी स्वामीजीच्या मूर्तीचे पूजन केले.

No comments:
Post a Comment