Wednesday, 22 January 2014

आज लाखो भावीकांना महाप्रसाद वितरण









आज विवेकानंद जयंती महोत्सवाचा शेवटचा दिवस जगद्गुरु स्वामी विवेकानंद यांची जयंती पौष वद्य सप्तमी त्या निमित्त संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाची सांगता दोन लाख भाविकांना पुरी भाजीच्या महाप्रसाद वितरणाने होते. काल हजारो स्वयंसेवकांनी २०१ क्विंटल गहू व १५० क्विंटल वांगे ,३०५० लिटर तेलाच्या सहाय्याने पुरी भाजी तयार केली .८० ते ८५ गावावरुन आलेल्या सुमारे४५०० कार्यकर्त्यांनी हा महाप्रसाद तयार केला. सकाळी ३ वाजता महाप्रसाद विभागात पुरी लाटण्याच्या कामाला सुरुवात झाली. रात्री उशिरा पर्यंत प्रसाद बनविण्याचे काम सुरु होते. आज १०० टॅक्टराच्या सहाय्याने २००० स्वयंसेवक ४० एकराच्या शेतात बसलेल्या भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी भाविकांना महाप्रसादासोबत पाणी पाऊच देण्यात येणार आहे. महाप्रसाद घेतांना माणसातील भेदाची भावना नष्ट व्हावी व आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, हा विचार वृध्दींगत व्हावा या हेतूने गत ५० वर्षापासून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न केला जातो. जयंती निमित्य भरणाऱ्या यात्रेला सुध्दा भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. यात्रेला जाण्याची ग्रामीण भागातील लोकांची हौस त्यामुळे पूर्ण होत आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने सुध्दा चौक बंदोबस्त ठेवला असून संस्थेच्या वतीने सी.सी.टी.व्ही कॅमेरी लावून व सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियुक्त करुन जयंती महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे.
व्यासपीठावर होणाऱ्या कार्यक्रमात आज रात्री प.पू.स्वामी शुकदास महाराजांचे आर्शीवचन होईल व अभय भंडारी, सांगली यांचे स्वामी विवेकानंदांच्या विचारावर प्रकाश टाकणारे व्याख्यान होणार आहे. तसेच अशोक महाराज जाधव यांचे कीर्तन यांच्या कीर्तनांचा कार्यक्रम व प्रख्यात गायक शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल.

No comments:

Post a Comment