Tuesday, 14 January 2014

विवेकानंद जन्मोत्सवाच्या जय्यत तयारीला सुरूवात



कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्रीं संस्थापित विवेकानंद आश्रमात मराठी तिथीनुसार दि.२१,२२,२३ जानेवारी २०१४ ला होवू घातलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून कार्यक्रम सुचारू पध्दतीने व्हावे म्हणून वेगवेगळया समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याचे माहिती विवेकानंद आश्रमाचे सुत्रांनी यावेळी दिली.सोबतच कामाच्या विभागणीच्या दहा समित्या गठित करण्यात आल्या असून भोजन समिती,यातायात समिती,सुरक्षा समिती ,महाप्रसाद वितरण समिती,व्यासपीठ व्यवस्था समिती इत्यादी समित्यांना त्यांची जबाबदारी वितरीत करण्यात आली असून यामध्ये किर्तन ,प्रवचन,व्याख्याने व गायनाचे कार्यक्रम आश्रमाच्या व्यासपीठावर होणार असून व्यासपीठासमोर भव्य शामीयाना टाकण्यात येणार आहे.भारतात विवेकानंद जन्मोत्सव तीन दिवस मोठया प्रमाणात फक्त विवेकानंद आश्रमातच साजरा केल्या जातो हे विशेष .
या कार्यक्रमाची आश्रमातील व अवघ्या महाराष्ट्रातील जनता अतुरतेने वाट पाहत आहे.या ठिकाणी या महोत्सवाच्या निमित्ताने तिन दिवस वैचारीक चळवळ राबविली जाते.चांगले संस्करण या ठिकाणी होत असते. त्यातुन जनतेला प्रेरणा मिळते.व चांगला माणूस घडण्यास मदत होते.या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींची किर्तने,प्रवचने,व्याख्याने व पट्टीचे गायक या व्यासपीठावरून आपली सेवा सादर करतात.या वर्षीचे कार्यक्रमात ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तायडे कल्याणा,ह.भ.प.अशोक महाराज जाधव पुणे,व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज खोडे यांची श्रीहरी किर्तने,वक्ता सहस्त्रेषु अभयजी भंडारी यांचे व्याख्यान,संजयजी गरूड पुणे,शंकरराव वैरागकर नाशिक,व शेवटचे दिवशी प्रख्यात शास्त्रीय गायक स्व.अभिषेकी बुवांचे चिरंचिव शौणकजी अभिषेकी यांचे सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट आहे.हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडावे म्हणून संपूर्ण विश्वस्त मंडळ हिरीरीने कामाला लागले आहे.

No comments:

Post a Comment