Thursday, 2 October 2014

विवेकानंद आश्रमात स्वच्छ भारत अभियान





राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत अभियान ' या स्वच्छता संबंधी मोहिमेला विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विविध शैक्षणिक विभागाच्या वतीने विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते ,विश्वस्त अशोक थोरहाते यांनी स्वतः हाती झाडू घेवून क्लिन इंडिया मोहिमेला दि.२ ऑक्टोबर २०१४ ला सकाळी सुरूवात करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी विविध शैक्षणिक विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने हजर होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य जी.डी.सोळंकी होते तर प्रमुख उपस्थीती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एल.गावंडे,ए.बी.एम. महाविद्यालयाचे ऐ.एम.अरूळकर मॅडम ,विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक यु.आर.करोडदे,मुक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ शेळके,अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता गोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस माहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस.पी.रोकडे यांनी माहात्मा गांधी यांची स्वच्छता अभियान व माहात्मा गांधीना अंर्तमन व परिसर स्वच्छ असणे कसे अभिप्रेत होते या संबंधीचे विचार विद्याथ्र्यां समोर मांडले.तसेच लाल बहादूर यांची साधी राहणी व उच्च विचार,देशभक्ती, राष्ट्र अभिमान,तास्कंद करार,जय जवान जय किसान या संबंधीचे विचार मांडले.तसेच आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी माहात्मा गांधी यांन आवडणारा कार्यक्रम म्हणजे स्वच्छता या संबंधीचे गांधीजीचे विचार विद्याथ्र्यांना सांगीतले. स्वच्छते संबंधीची शपथ सामूहिकरित्या विद्याथ्र्यांना ऐ.एस. गि-हे यांनी दिली.
आभार प्रदर्शन राधा चोपडे हिने केले .कार्यक्रमानंतर विवेकानंद नगर या गावात विवेकानंद विद्या मंदिर,विवेकानंद कृषि महाविद्यालय,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,ऐ.बी.एम कॉलेज,विवेकानंद विज्ञान महाविद्यालय या सर्व शैक्षणिक विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी ,शिक्षक ,प्राध्यापक,अधिकारी यांनी हातात झाडू घेवून ग्राम स्वच्छता केली व ग्राम स्वच्छते संबंधीची जनजागृती ग्रामवासीयांमध्ये करून दिली.

Thursday, 25 September 2014

२४ सप्टेंबर 'वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा व्हावा-शुकदास महाराज


भारतासारख्या विकसनशिल देशाने संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारी आहे. या देशातील विव्दता, परिश्रम करण्याची क्षमता व संशोधन वृत्ती कधीच मागे नव्हती. काल शास्त्रज्ञांच्या सामूहिक पुरूषार्थाने इस्त्रो अवकाश सेंटर वरून मंगळाकडे यशस्वीपणे झेपवणारे मंगळयान ही वैज्ञानिकांनी देशाला दिलेली देणगी आहे व देशवासीयांची केलेली सेवा आहे. या वैज्ञानिकांचा सन्मान म्हणून व भावि काळात विद्याथ्र्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढावी यासाठी शासनाने २७ सप्टेंबर हा दिवस 'वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा करावा.अशी अपेक्षा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक व संशोधक वृत्ती जोपासणारे आधुनिक धन्वंतरी प.पू.शुकदास महाराज यांनी व्यक्त केली. काल २४ सप्टेंबर ला मंगळयानाच्या यशस्वीतेबद्दल कृषि महाविद्यालयाने आयोजीत केलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते विद्याथ्र्यांशी बोलत होते.
संत आणि संशोधक हे एकाच वृत्तीचे असतात. संत हे समाजाच्या कल्याणासाठी व आनंदासाठी जीवन जगतात, तर संशोधक समाजात आनंद निर्माण करण्यासाठी सामुग्री निर्माण करतात. संशोधनाने दारिद्रय, निरक्षरता, रोगराई इत्यादी समस्यांवर उपाय योजना करणे शक्य होईल. विद्याथ्र्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी शिक्षक व पालकांनी विद्याथ्र्यांमधील वैज्ञानिक दृष्टि जोपासावी असेही ते पुढे म्हणाले. लहान मुलांना मंत्रासोबत यंत्र चालविण्याचे तंत्र अवगत होणे हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे असेही ते म्हणाले. कृषि ,आरोग्य इत्यादी क्षेत्रातही खूप संशोधन होणे गरजेचे आहे. मलेरिया,डेंगू इत्यादी रोगामुळे लाखो बालकांना प्राण गमावे लागत आहे. तर स्वच्छ पेयजल नसल्यामुळे अनेक रोगांचे प्रमाण वाढत आहे. यावर संशोधन होऊन या समस्या नष्ट होण्यासाठी वैज्ञानिक तयार व्हावेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विवेकानंद कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक उपस्थित होते.

Wednesday, 22 January 2014

आज लाखो भावीकांना महाप्रसाद वितरण









आज विवेकानंद जयंती महोत्सवाचा शेवटचा दिवस जगद्गुरु स्वामी विवेकानंद यांची जयंती पौष वद्य सप्तमी त्या निमित्त संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाची सांगता दोन लाख भाविकांना पुरी भाजीच्या महाप्रसाद वितरणाने होते. काल हजारो स्वयंसेवकांनी २०१ क्विंटल गहू व १५० क्विंटल वांगे ,३०५० लिटर तेलाच्या सहाय्याने पुरी भाजी तयार केली .८० ते ८५ गावावरुन आलेल्या सुमारे४५०० कार्यकर्त्यांनी हा महाप्रसाद तयार केला. सकाळी ३ वाजता महाप्रसाद विभागात पुरी लाटण्याच्या कामाला सुरुवात झाली. रात्री उशिरा पर्यंत प्रसाद बनविण्याचे काम सुरु होते. आज १०० टॅक्टराच्या सहाय्याने २००० स्वयंसेवक ४० एकराच्या शेतात बसलेल्या भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी भाविकांना महाप्रसादासोबत पाणी पाऊच देण्यात येणार आहे. महाप्रसाद घेतांना माणसातील भेदाची भावना नष्ट व्हावी व आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, हा विचार वृध्दींगत व्हावा या हेतूने गत ५० वर्षापासून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न केला जातो. जयंती निमित्य भरणाऱ्या यात्रेला सुध्दा भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. यात्रेला जाण्याची ग्रामीण भागातील लोकांची हौस त्यामुळे पूर्ण होत आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने सुध्दा चौक बंदोबस्त ठेवला असून संस्थेच्या वतीने सी.सी.टी.व्ही कॅमेरी लावून व सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियुक्त करुन जयंती महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे.
व्यासपीठावर होणाऱ्या कार्यक्रमात आज रात्री प.पू.स्वामी शुकदास महाराजांचे आर्शीवचन होईल व अभय भंडारी, सांगली यांचे स्वामी विवेकानंदांच्या विचारावर प्रकाश टाकणारे व्याख्यान होणार आहे. तसेच अशोक महाराज जाधव यांचे कीर्तन यांच्या कीर्तनांचा कार्यक्रम व प्रख्यात गायक शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल.

Monday, 20 January 2014

विवेकानंद जयंती महोत्सवाची आजपासून सुरूवात


कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मराठी तिथीनुसार पौषवद्य पंचमी ते सप्तमी दि.२१,२२,२३ जानेवारी रोज मंगळवार,बुधवार,गुरूवार २०१४ होऊ घातलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळयाला आज दि.२१ जानेवारीवाला गजानन शास्त्रीच्या वेदमंत्र घोषाने व सनई चौघडयाच्या मंगल धुनने सुरूवात झाली .या विवेकानंद जन्मोत्सवाची महाराष्ट्रातील जनता मोठया आतुरतेने प्रतिक्षा करत असते.कारण या सोहळयामध्ये मानवी आवश्यकतेनुसार धार्मिक,सांस्कृतिक,बौध्दिक,सांगितिक,वैचारिक अशा सर्व प्रकारची मेजवाणी या ठिकाणी मिळते व चांगले संस्करण या जन्मोत्सव सोहळयात होत असते. व त्यातुन विवेकानंदांना अपेक्षित असलेला मानवतावाद यातून व्यक्ती व्यक्तीत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.आजच्या कार्यक्रमात प.पू.महाराजश्रींच्या अनुभूतिचे गायन,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कल्याणाकर यांचे श्री हरीकिर्तन तसेच पुणे येथील ह.भ.प.अशोक महाराज जाधव यांचे श्रीहरीकिर्तन व दुपारी २ वाजता स्वामी विवेकानंदांची रथातून भव्य शोभायात्रा निघते .या शोभायात्रेत महिला व पुरूषांच्या ६० ते ६५ दिंड्या ,२० ते २५ लेक्षिमपथके,२० बँडपथके,अशी भव्य शोभा यात्रा हरिहर तीर्थावरून प्रारंभ होते व सायंकाळी जि.प्र.प्राथ.शाळेचे प्रांगणात ६ वाजता दहीहंडीने त्यांची सांगता होते.सांयकाळी ६ ते ८ वीट जि.सांगली येथील प्रख्यात वक्ते अभय भंडारी यांचे विवेकानंदांचे वैचारीक साहित्यावर अभ्यासपूर्ण भाषण व रात्री ८ ते विजय तनपूरे यांचा शिवगर्जना हा कार्यक्रम आणि रात्री पुणे येथील प्रसिध्द गायक संजय गरूड यांचे सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम असा पहिला दिवस भरगच्च कार्यक्रमाणे संपन्न होतो.

Saturday, 18 January 2014

शुकदास महाराज आधुनिक एकलव्य- बिपीनकुमार बिहारी



विवेकानंद आश्रमाचा परिसर मानवी मनाला मोहून टाकणारा आहे,या ठिकाणी सुरू असणारे सर्व सेवा उपक्रम हे समाजाला प्रगतीकडे नेणारे आहेत.एकलव्याने ज्या प्रमाणे द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून सर्व शौर्य व कौशल्य हस्तगत केले होते त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांची प्रतिमा समोर ठेवून समाजाचे कल्याण हे जीवन ध्येय ठरवून व त्यासाठीचा दृष्टीकोन अंगीकारून शुकदास महाराज काम करित आहेत एकलव्याची स्वामी निष्ठा व एकाग्रता त्यांच्या अंगी आहे म्हणून ते खèया अर्थाने आधुनिक एकलव्यच आहेत.असे उद्गार अमरावती विभागाचे आय.जी.बिपीन बिहारी यांनी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट प्रसंगी काढले.यावेळी त्यांचे सोबत जिल्हा पोलीस अधिक्षक शामराव दिघावकर,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय रांगणेकर,साखरखेर्डा ठाणेदार अशोक लांडे हे होते.आश्रमात आगमन प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.संस्थेचे हरिहरतीर्थ ,विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन त्यांचे महाराजांच्या निवासस्थानी आगमन झाले.महाराजांशी बोलतांना त्यांनी विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक कार्याने ग्रामीण भागातील टॅलेन्ट प्रशासकिय सेवेत येण्यास मदत होईल तसेच संस्थेच्या सेवा उपक्रमामुळे विवेकानंदांना अपेक्षित असलेला निर्भय,सेवाव्रती व दुसèयांचे दुःख जाणून घेणारा संवेदनशिल तरूण निर्माण होईल.असे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी विवेकानंद जयंती महोत्सवाच्या शुभेच्छा देत उत्सवादरम्यान शांतता,सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी दक्ष राहावे व्यवस्थापनाला व सहभागी भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,विश्वस्त अशोकभाऊ थोरहाते,के.के.भिसडे,विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Tuesday, 14 January 2014

विवेकानंद जन्मोत्सवाच्या जय्यत तयारीला सुरूवात



कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्रीं संस्थापित विवेकानंद आश्रमात मराठी तिथीनुसार दि.२१,२२,२३ जानेवारी २०१४ ला होवू घातलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून कार्यक्रम सुचारू पध्दतीने व्हावे म्हणून वेगवेगळया समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याचे माहिती विवेकानंद आश्रमाचे सुत्रांनी यावेळी दिली.सोबतच कामाच्या विभागणीच्या दहा समित्या गठित करण्यात आल्या असून भोजन समिती,यातायात समिती,सुरक्षा समिती ,महाप्रसाद वितरण समिती,व्यासपीठ व्यवस्था समिती इत्यादी समित्यांना त्यांची जबाबदारी वितरीत करण्यात आली असून यामध्ये किर्तन ,प्रवचन,व्याख्याने व गायनाचे कार्यक्रम आश्रमाच्या व्यासपीठावर होणार असून व्यासपीठासमोर भव्य शामीयाना टाकण्यात येणार आहे.भारतात विवेकानंद जन्मोत्सव तीन दिवस मोठया प्रमाणात फक्त विवेकानंद आश्रमातच साजरा केल्या जातो हे विशेष .
या कार्यक्रमाची आश्रमातील व अवघ्या महाराष्ट्रातील जनता अतुरतेने वाट पाहत आहे.या ठिकाणी या महोत्सवाच्या निमित्ताने तिन दिवस वैचारीक चळवळ राबविली जाते.चांगले संस्करण या ठिकाणी होत असते. त्यातुन जनतेला प्रेरणा मिळते.व चांगला माणूस घडण्यास मदत होते.या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींची किर्तने,प्रवचने,व्याख्याने व पट्टीचे गायक या व्यासपीठावरून आपली सेवा सादर करतात.या वर्षीचे कार्यक्रमात ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तायडे कल्याणा,ह.भ.प.अशोक महाराज जाधव पुणे,व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज खोडे यांची श्रीहरी किर्तने,वक्ता सहस्त्रेषु अभयजी भंडारी यांचे व्याख्यान,संजयजी गरूड पुणे,शंकरराव वैरागकर नाशिक,व शेवटचे दिवशी प्रख्यात शास्त्रीय गायक स्व.अभिषेकी बुवांचे चिरंचिव शौणकजी अभिषेकी यांचे सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट आहे.हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडावे म्हणून संपूर्ण विश्वस्त मंडळ हिरीरीने कामाला लागले आहे.

Monday, 13 January 2014

हरिहरतीर्थावर भव्य स्वामी विवेकानंद मूर्तीची प्राणप्रतिष्ठा




कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री संस्थापित, विवेकानंद आश्रमाच्या हरिहरतीर्थावर हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले माणसाच्या मनाला मोहित करणारे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र सतत वाहणा-या पावनजल धारेच्या स्नानामुळे भाविकांना आनंद देणारे हरिहरतीर्थ हे जिल्हायातील भाविकांसाठी अत्यंत श्रध्देचे स्थळ आहे.हरीहरतीर्थावर भगवान बालाजी व आशुतोष भगवान शंकराचे भव्य मंदिरे आहेत.१२ जानेवारी २०१४ ला विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून या परिसरात स्वामी विवेकानंदांच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली.युवकांचे आदर्श असलेले व भारतमातेबदल अत्यंतीक प्रेम असलेल्या स्वामीजींची मूर्ती ही सर्वांसाठी प्रेरणा देत राहील .मूर्तीची स्थापना श्री रवींद्र अवस्थी ,मेहकर यांच्या हस्ते करण्यात येवून श्री नरहरी जोशी महाराज यांनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.
या सोहळयाला मेहकरचे आमदार डॉ.संजयजी रायमूलकर यांनी भेट दिली. या कार्यक्रमात विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव वि.ब.कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोकभाऊ थोरहाते,ना.मा.भारस्कर,के.के.भिसडे,व अशोक गि-हे इत्यादी उपस्थित होते.महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थीनींनी स्वामीजीच्या मूर्तीचे पूजन केले.