Monday, 23 March 2015

शिक्षणाचा उपयोग सेवेसाठी करा - शुकदास महाराज


शिक्षित होणे आणि शहाणा होणे यात फरक आहे. ज्ञानाचा वापर दुखः निवारण्यासाठी होतो. कृषी शाखेचे पदवीधर होतांना तुमच्या अभ्यासाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी शेतक-यांचे जीवनमान उंचवीण्यासाठी करा. नैसर्गीक आपत्तीने शेतकरी खचला आहे, प्रपंचाचा भार वाहतांना त्याची दमछाक होत आहे. नैसर्गीक समस्यांना तोंड देणा-या व अधिक उत्पन्न देणा-या पिकांच्या नवीन जातींसाठी कृषी क्षेत्रात संशोधन व्हावे त्यासाठी शेती आणि मातीचा अभ्यास करुन आपल्या शिक्षणाचा उपयोग सेवेसाठी करा असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे संस्थापक प.पू. शुकदास महाराजांनी कृषी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात उद्घाटन प्रसंगी बोलतांना काढले. २३ मार्चला ‘फिनीक्स ' या तीन दिवस चालणा-या स्नेहसंम्मेलनाला थाटात सुरुवात झाली. प्रमुख पाहूणे म्हणून मेहकरचे नायब तहसिलदार मानकर होते. २३ मार्च या शहिद दिनानिमित्त शहीदांना अभिवादन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नेतृत्वाचा गुण अंगभुत असतो तो लादल्याने निर्माण होत नाही त्यामुळे आपल्यातील अंगभुत गुणांना आपण जपले पाहीजे. संसारीकाचा प्रपंच पत्नी आणि मुलं ऐवढाच असतो, ब्रम्हचारी हा संसारीक नसतो परंतु शुकदास महाराज या ब्रम्हचा-याने हजारो विद्याथ्र्यांना पुत्रवत प्रेम देवून त्यांचे जीवन घडवून त्यांच्या सेवेचा प्रपंच मांडला आहे. असे उद्गार नायब तहसिलदार मानकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना काढले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेश देवकर याने लिहलेला ‘जखमा नव्या युगाच्याङ्क या चारोळी संग्रहाचे विमोचन शुकदास महाराजश्रींचे हस्ते करण्यात आले. प्राचार्य गावंडे यांनी महाविद्यालयाची गत वर्षातील विद्यार्थी गुणवत्ता व विद्याथ्र्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांबदद्लची माहीती दिली. कार्यक्रमाला आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य गावंडे व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य शेवाळे, विद्यार्थी प्रतिनिधी सागर सौदर, शरद जाधव तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरी मानतकर, कुशल राजेजाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दयासागर अंभोरे, वैशाली जाधव यांनी केले.

Saturday, 28 February 2015

० विज्ञानाने जगणे सुलभ होते- स्वामी शुकदास महाराजश्री

             ० विज्ञानाने जगणे सुलभ होते- स्वामी शुकदास महाराजश्री 
       ‘विज्ञानाने मानवसमाजातील दुःख दैन्य दूर करण्यासाठी सामुग्री मिळवता येते. अन्न, वस्त्र, निवारा हया गरजा पुर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीला पर्याय नाही. देशात आरोग्य व कृषी क्षेत्रात झालेल्या बहुमोल संशोधनामुळे जनतेला दोन वेळचे पोटभर जेवन व रोगमुक्त होण्यासाठी औषधी मिळत आहेत, परंतु गेल्या काही दिवसापासून शहरी भागात टी.बी. व स्वाईन फ्लू च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मेडीसीन मध्ये अधिक संशोधनाची गरज आहे. वैद्यकीय शिक्षण घेवून स्वतःचा टोलेजंग दवाखाना बांधणे व पैसा कमावणे या वृत्तीमुळे संशोधनासारख्या विषयासाठी वेळ देण्याची कोणाची तयारी नाही. मुलभूत विज्ञान शाखांमध्ये खुप काम करण्याची गरज आहे. कारण विज्ञान दैन्य, दुःख, उपासमार, रोगराई  कमी करु शकते. आवश्यक सोयी-सुविधा पुरवून जगणे सुलभ करु शकते’, असे विचार विवेकानंद आश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री यांनी विवेकानंद महाविद्यालयात २८ फेब्रु. रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम प्रसंगी विद्याथ्र्यांशी बोलतांना व्यक्त केले.

                ‘पालकांनी मुलांमधील संशोधक वृत्ती वाढावी व त्यांच्यातील वैज्ञानीक जीवंत राहावा यासाठी मुलांना प्रयोगासाठी म्हणून लागणा-या सर्व गोष्टी पुरवाव्यात कारण प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारण भाव जाणून घेणे हा विद्याथ्र्यांचा हक्क आहे, त्यासाठी प्रसंगी पालकांनी आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी सांगीतले. या विज्ञान दिन कार्यक्रमानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने विद्याथ्र्यांसाठी पोस्टर्स स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धेत २५ विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. पोस्टर्स साठी ‘मायक्रोबायोलॉजी इन इन्डस्ट्री हा विषय ठेवला होता.        कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य जे.डी.सोळंकी होते. याप्रसंगी आश्रमाचे सचिव संतोष गोरे, विश्वस्त अशोक थोरहाते, प्रा.डॉ. अशोक पवार, प्रा.मु-हेकर, प्रा.मालठाणे, प्रा.मोरे मॅडम, प्रा.कस्तुरे मॅडम, प्रा.सोळंकी मॅडम, प्रा.गणबास, प्रा.शेख, व विद्यार्थी उपस्थित होते.  

Thursday, 2 October 2014

विवेकानंद आश्रमात स्वच्छ भारत अभियान





राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत अभियान ' या स्वच्छता संबंधी मोहिमेला विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विविध शैक्षणिक विभागाच्या वतीने विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते ,विश्वस्त अशोक थोरहाते यांनी स्वतः हाती झाडू घेवून क्लिन इंडिया मोहिमेला दि.२ ऑक्टोबर २०१४ ला सकाळी सुरूवात करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी विविध शैक्षणिक विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने हजर होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य जी.डी.सोळंकी होते तर प्रमुख उपस्थीती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एल.गावंडे,ए.बी.एम. महाविद्यालयाचे ऐ.एम.अरूळकर मॅडम ,विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक यु.आर.करोडदे,मुक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ शेळके,अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता गोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस माहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस.पी.रोकडे यांनी माहात्मा गांधी यांची स्वच्छता अभियान व माहात्मा गांधीना अंर्तमन व परिसर स्वच्छ असणे कसे अभिप्रेत होते या संबंधीचे विचार विद्याथ्र्यां समोर मांडले.तसेच लाल बहादूर यांची साधी राहणी व उच्च विचार,देशभक्ती, राष्ट्र अभिमान,तास्कंद करार,जय जवान जय किसान या संबंधीचे विचार मांडले.तसेच आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी माहात्मा गांधी यांन आवडणारा कार्यक्रम म्हणजे स्वच्छता या संबंधीचे गांधीजीचे विचार विद्याथ्र्यांना सांगीतले. स्वच्छते संबंधीची शपथ सामूहिकरित्या विद्याथ्र्यांना ऐ.एस. गि-हे यांनी दिली.
आभार प्रदर्शन राधा चोपडे हिने केले .कार्यक्रमानंतर विवेकानंद नगर या गावात विवेकानंद विद्या मंदिर,विवेकानंद कृषि महाविद्यालय,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,ऐ.बी.एम कॉलेज,विवेकानंद विज्ञान महाविद्यालय या सर्व शैक्षणिक विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी ,शिक्षक ,प्राध्यापक,अधिकारी यांनी हातात झाडू घेवून ग्राम स्वच्छता केली व ग्राम स्वच्छते संबंधीची जनजागृती ग्रामवासीयांमध्ये करून दिली.

Thursday, 25 September 2014

२४ सप्टेंबर 'वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा व्हावा-शुकदास महाराज


भारतासारख्या विकसनशिल देशाने संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारी आहे. या देशातील विव्दता, परिश्रम करण्याची क्षमता व संशोधन वृत्ती कधीच मागे नव्हती. काल शास्त्रज्ञांच्या सामूहिक पुरूषार्थाने इस्त्रो अवकाश सेंटर वरून मंगळाकडे यशस्वीपणे झेपवणारे मंगळयान ही वैज्ञानिकांनी देशाला दिलेली देणगी आहे व देशवासीयांची केलेली सेवा आहे. या वैज्ञानिकांचा सन्मान म्हणून व भावि काळात विद्याथ्र्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढावी यासाठी शासनाने २७ सप्टेंबर हा दिवस 'वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा करावा.अशी अपेक्षा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक व संशोधक वृत्ती जोपासणारे आधुनिक धन्वंतरी प.पू.शुकदास महाराज यांनी व्यक्त केली. काल २४ सप्टेंबर ला मंगळयानाच्या यशस्वीतेबद्दल कृषि महाविद्यालयाने आयोजीत केलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते विद्याथ्र्यांशी बोलत होते.
संत आणि संशोधक हे एकाच वृत्तीचे असतात. संत हे समाजाच्या कल्याणासाठी व आनंदासाठी जीवन जगतात, तर संशोधक समाजात आनंद निर्माण करण्यासाठी सामुग्री निर्माण करतात. संशोधनाने दारिद्रय, निरक्षरता, रोगराई इत्यादी समस्यांवर उपाय योजना करणे शक्य होईल. विद्याथ्र्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी शिक्षक व पालकांनी विद्याथ्र्यांमधील वैज्ञानिक दृष्टि जोपासावी असेही ते पुढे म्हणाले. लहान मुलांना मंत्रासोबत यंत्र चालविण्याचे तंत्र अवगत होणे हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे असेही ते म्हणाले. कृषि ,आरोग्य इत्यादी क्षेत्रातही खूप संशोधन होणे गरजेचे आहे. मलेरिया,डेंगू इत्यादी रोगामुळे लाखो बालकांना प्राण गमावे लागत आहे. तर स्वच्छ पेयजल नसल्यामुळे अनेक रोगांचे प्रमाण वाढत आहे. यावर संशोधन होऊन या समस्या नष्ट होण्यासाठी वैज्ञानिक तयार व्हावेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विवेकानंद कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक उपस्थित होते.

Wednesday, 22 January 2014

आज लाखो भावीकांना महाप्रसाद वितरण









आज विवेकानंद जयंती महोत्सवाचा शेवटचा दिवस जगद्गुरु स्वामी विवेकानंद यांची जयंती पौष वद्य सप्तमी त्या निमित्त संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाची सांगता दोन लाख भाविकांना पुरी भाजीच्या महाप्रसाद वितरणाने होते. काल हजारो स्वयंसेवकांनी २०१ क्विंटल गहू व १५० क्विंटल वांगे ,३०५० लिटर तेलाच्या सहाय्याने पुरी भाजी तयार केली .८० ते ८५ गावावरुन आलेल्या सुमारे४५०० कार्यकर्त्यांनी हा महाप्रसाद तयार केला. सकाळी ३ वाजता महाप्रसाद विभागात पुरी लाटण्याच्या कामाला सुरुवात झाली. रात्री उशिरा पर्यंत प्रसाद बनविण्याचे काम सुरु होते. आज १०० टॅक्टराच्या सहाय्याने २००० स्वयंसेवक ४० एकराच्या शेतात बसलेल्या भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी भाविकांना महाप्रसादासोबत पाणी पाऊच देण्यात येणार आहे. महाप्रसाद घेतांना माणसातील भेदाची भावना नष्ट व्हावी व आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, हा विचार वृध्दींगत व्हावा या हेतूने गत ५० वर्षापासून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न केला जातो. जयंती निमित्य भरणाऱ्या यात्रेला सुध्दा भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. यात्रेला जाण्याची ग्रामीण भागातील लोकांची हौस त्यामुळे पूर्ण होत आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने सुध्दा चौक बंदोबस्त ठेवला असून संस्थेच्या वतीने सी.सी.टी.व्ही कॅमेरी लावून व सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियुक्त करुन जयंती महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे.
व्यासपीठावर होणाऱ्या कार्यक्रमात आज रात्री प.पू.स्वामी शुकदास महाराजांचे आर्शीवचन होईल व अभय भंडारी, सांगली यांचे स्वामी विवेकानंदांच्या विचारावर प्रकाश टाकणारे व्याख्यान होणार आहे. तसेच अशोक महाराज जाधव यांचे कीर्तन यांच्या कीर्तनांचा कार्यक्रम व प्रख्यात गायक शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल.