शिक्षित होणे आणि शहाणा होणे यात फरक आहे. ज्ञानाचा वापर दुखः निवारण्यासाठी होतो. कृषी शाखेचे पदवीधर होतांना तुमच्या अभ्यासाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी शेतक-यांचे जीवनमान उंचवीण्यासाठी करा. नैसर्गीक आपत्तीने शेतकरी खचला आहे, प्रपंचाचा भार वाहतांना त्याची दमछाक होत आहे. नैसर्गीक समस्यांना तोंड देणा-या व अधिक उत्पन्न देणा-या पिकांच्या नवीन जातींसाठी कृषी क्षेत्रात संशोधन व्हावे त्यासाठी शेती आणि मातीचा अभ्यास करुन आपल्या शिक्षणाचा उपयोग सेवेसाठी करा असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे संस्थापक प.पू. शुकदास महाराजांनी कृषी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात उद्घाटन प्रसंगी बोलतांना काढले. २३ मार्चला ‘फिनीक्स ' या तीन दिवस चालणा-या स्नेहसंम्मेलनाला थाटात सुरुवात झाली. प्रमुख पाहूणे म्हणून मेहकरचे नायब तहसिलदार मानकर होते. २३ मार्च या शहिद दिनानिमित्त शहीदांना अभिवादन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नेतृत्वाचा गुण अंगभुत असतो तो लादल्याने निर्माण होत नाही त्यामुळे आपल्यातील अंगभुत गुणांना आपण जपले पाहीजे. संसारीकाचा प्रपंच पत्नी आणि मुलं ऐवढाच असतो, ब्रम्हचारी हा संसारीक नसतो परंतु शुकदास महाराज या ब्रम्हचा-याने हजारो विद्याथ्र्यांना पुत्रवत प्रेम देवून त्यांचे जीवन घडवून त्यांच्या सेवेचा प्रपंच मांडला आहे. असे उद्गार नायब तहसिलदार मानकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना काढले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेश देवकर याने लिहलेला ‘जखमा नव्या युगाच्याङ्क या चारोळी संग्रहाचे विमोचन शुकदास महाराजश्रींचे हस्ते करण्यात आले. प्राचार्य गावंडे यांनी महाविद्यालयाची गत वर्षातील विद्यार्थी गुणवत्ता व विद्याथ्र्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांबदद्लची माहीती दिली. कार्यक्रमाला आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त अशोक थोरहाते, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य गावंडे व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य शेवाळे, विद्यार्थी प्रतिनिधी सागर सौदर, शरद जाधव तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरी मानतकर, कुशल राजेजाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दयासागर अंभोरे, वैशाली जाधव यांनी केले.
Monday, 23 March 2015
Saturday, 28 February 2015
० विज्ञानाने जगणे सुलभ होते- स्वामी शुकदास महाराजश्री
० विज्ञानाने
जगणे सुलभ होते- स्वामी
शुकदास महाराजश्री
‘विज्ञानाने
मानवसमाजातील दुःख दैन्य दूर करण्यासाठी सामुग्री मिळवता येते. अन्न, वस्त्र,
निवारा
हया गरजा पुर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीला पर्याय नाही.
देशात आरोग्य व कृषी क्षेत्रात झालेल्या बहुमोल संशोधनामुळे जनतेला दोन वेळचे
पोटभर जेवन व रोगमुक्त होण्यासाठी औषधी मिळत आहेत, परंतु गेल्या
काही दिवसापासून शहरी भागात टी.बी. व स्वाईन फ्लू च्या रुग्णांची वाढती संख्या
लक्षात घेता मेडीसीन मध्ये अधिक संशोधनाची गरज आहे. वैद्यकीय शिक्षण घेवून स्वतःचा
टोलेजंग दवाखाना बांधणे व पैसा कमावणे या वृत्तीमुळे संशोधनासारख्या विषयासाठी वेळ
देण्याची कोणाची तयारी नाही. मुलभूत विज्ञान शाखांमध्ये खुप काम करण्याची गरज आहे.
कारण विज्ञान दैन्य, दुःख, उपासमार, रोगराई कमी करु शकते. आवश्यक
सोयी-सुविधा पुरवून जगणे सुलभ करु शकते’, असे विचार विवेकानंद आश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष
कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री यांनी विवेकानंद महाविद्यालयात २८ फेब्रु. रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान
दिन ’ कार्यक्रम
प्रसंगी विद्याथ्र्यांशी बोलतांना व्यक्त केले.
‘पालकांनी मुलांमधील
संशोधक वृत्ती वाढावी व त्यांच्यातील वैज्ञानीक जीवंत राहावा यासाठी मुलांना
प्रयोगासाठी म्हणून लागणा-या सर्व गोष्टी पुरवाव्यात कारण प्रत्येक गोष्टीमागील
कार्यकारण भाव जाणून घेणे हा विद्याथ्र्यांचा हक्क आहे, त्यासाठी
प्रसंगी पालकांनी आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा’ असेही त्यांनी सांगीतले. या विज्ञान
दिन कार्यक्रमानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने विद्याथ्र्यांसाठी पोस्टर्स
स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धेत २५ विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. पोस्टर्स
साठी ‘मायक्रोबायोलॉजी इन इन्डस्ट्री’ हा विषय ठेवला होता. कार्यक्रमाचे
अध्यक्ष स्थानी प्राचार्य जे.डी.सोळंकी होते. याप्रसंगी आश्रमाचे सचिव संतोष गोरे,
विश्वस्त
अशोक थोरहाते, प्रा.डॉ. अशोक पवार, प्रा.मु-हेकर,
प्रा.मालठाणे,
प्रा.मोरे
मॅडम, प्रा.कस्तुरे मॅडम, प्रा.सोळंकी मॅडम, प्रा.गणबास,
प्रा.शेख,
व
विद्यार्थी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)