Saturday, 27 September 2014
Thursday, 25 September 2014
२४ सप्टेंबर 'वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा व्हावा-शुकदास महाराज
भारतासारख्या विकसनशिल देशाने संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारी आहे. या देशातील विव्दता, परिश्रम करण्याची क्षमता व संशोधन वृत्ती कधीच मागे नव्हती. काल शास्त्रज्ञांच्या सामूहिक पुरूषार्थाने इस्त्रो अवकाश सेंटर वरून मंगळाकडे यशस्वीपणे झेपवणारे मंगळयान ही वैज्ञानिकांनी देशाला दिलेली देणगी आहे व देशवासीयांची केलेली सेवा आहे. या वैज्ञानिकांचा सन्मान म्हणून व भावि काळात विद्याथ्र्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढावी यासाठी शासनाने २७ सप्टेंबर हा दिवस 'वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा करावा.अशी अपेक्षा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक व संशोधक वृत्ती जोपासणारे आधुनिक धन्वंतरी प.पू.शुकदास महाराज यांनी व्यक्त केली. काल २४ सप्टेंबर ला मंगळयानाच्या यशस्वीतेबद्दल कृषि महाविद्यालयाने आयोजीत केलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते विद्याथ्र्यांशी बोलत होते.
संत आणि संशोधक हे एकाच वृत्तीचे असतात. संत हे समाजाच्या कल्याणासाठी व आनंदासाठी जीवन जगतात, तर संशोधक समाजात आनंद निर्माण करण्यासाठी सामुग्री निर्माण करतात. संशोधनाने दारिद्रय, निरक्षरता, रोगराई इत्यादी समस्यांवर उपाय योजना करणे शक्य होईल. विद्याथ्र्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी शिक्षक व पालकांनी विद्याथ्र्यांमधील वैज्ञानिक दृष्टि जोपासावी असेही ते पुढे म्हणाले. लहान मुलांना मंत्रासोबत यंत्र चालविण्याचे तंत्र अवगत होणे हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे असेही ते म्हणाले. कृषि ,आरोग्य इत्यादी क्षेत्रातही खूप संशोधन होणे गरजेचे आहे. मलेरिया,डेंगू इत्यादी रोगामुळे लाखो बालकांना प्राण गमावे लागत आहे. तर स्वच्छ पेयजल नसल्यामुळे अनेक रोगांचे प्रमाण वाढत आहे. यावर संशोधन होऊन या समस्या नष्ट होण्यासाठी वैज्ञानिक तयार व्हावेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विवेकानंद कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)